ठाणे- नाशिक येथील मोनिका औटी यांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी सोमवारी ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. त्यामुळे वडपे ते कोपरी आनंदनगर नाका असे २९ किलोमीटरचे अंतर रुग्णवाहिकेने अवघ्या ३१ मिनिटात पार केले. ऐन वाहतुकीच्या कालावधीत पोलिसांनी हा ग्रीन कॉरिडॉर तयार केल्याने वाहतूक पोलिसांच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
यकृत प्रत्यारोपणासाठी ठाण्यात ग्रीन कॉरिडॉर; 29 किलोमीटरचा प्रवास झाला अवघ्या 31 मिनिटात
नाशिक येथील मोनिका औटी यांच्या यकृत प्रत्यारोपणासाठी सोमवारी ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीण पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. त्यामुळे वडपे ते कोपरी आनंदनगर नाका असे २९ किलोमीटरचे अंतर रूग्णवाहिकेने अवघ्या ३१ मिनीटात पार केले.
नाशिक येथे राहणाऱ्या मोनिका औटी यांना यकृताचा आजार होता. सुदैवाने एक यकृत मुंबईतील केईएम रुग्णालयात उपलब्ध झाल्याने त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. त्यामुळे ग्रीन कॉरिडॉर करून त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी नाशिक, मुंबई पोलिसांसोबत समन्वय साधून भिवंडीतील वडपे ते कोपरीतील आनंदनगर नाका या २९ किलोमीटरच्या अंतरासाठी ग्रीन कॉरीडॉर तयार केला होता. या ग्रीन कॉरिडॉरमुळे रुग्णवाहिकेने अवघ्या ३१ मिनिटात हे अंतर पार केले.