ठाणे- डोंबिवलीच्या पेंडसेनगर परिसरातील नुतन पद्मश्री इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये फ्रिजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत किचनमधील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले.
डोंबिवलीत शॉटसर्किटमुळे लागली आग; संसार उपयोगी साहित्य जळून खाक
नुतन पद्मश्री इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये फ्रिजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत किचनमधील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले.
डोंबिवली पूर्वेतील पेंडसे नगर, येथे नूतन पद्मश्री इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रूम क्रमांक ११ मध्ये हर्षल बेलवटे हे कुटुंबासह राहतात. त्यांच्या किचनमध्ये असलेल्या फ्रिजमध्ये सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास शॉटसर्किट झाल्याने आग लागली. किचनच्या खिडकीतून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्यलयात संपर्क करून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत बेलवटे यांच्या किचनमधील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालेले नाही.