ठाणे - १४८ विधानसभा मतदारसंघातंर्गत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अनुराधा बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील एनईटीटी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे चुनाव पाठशाला हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. चुनाव पाठशालाच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व पटवून देण्यात आले.
चुनाव पाठशालाच्या माध्यमातून ठाण्यात मतदानाबाबत जनजागृती
विद्यार्थ्यांनी त्यांचे आईवडील, नातेवाईक, शेजारी यांना निवडणुकीत मतदानासाठी प्रवृत्त करावे या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी शिक्षकांमार्फत देखील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ करता मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान हे आपले कर्तव्य समजून मतदान करावे. याकरता विविध स्तरावर जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अनुषंगाने आज एनईटीटी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथे चुनाव पाठशाला हा उपक्रम घेण्यात आला.
विद्यार्थ्यांनी त्यांचे आईवडील, नातेवाईक, शेजारी यांना निवडणुकीत मतदानासाठी प्रवृत्त करावे या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. यावेळी शिक्षकांमार्फत देखील विद्यार्थ्यांमध्ये मतदानाबाबत जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०१९ करता मतदानाच्या दिवशी वापरण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफेबेल पेपर ऑडिट ट्रेल) मशीनचे प्रात्यक्षिक देखील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजयकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा प्रभाग समितीमध्ये व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफेबेल पेपर ऑडिट ट्रेल) मशीनचे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवण्यात आले.