ठाणे- डोंबिवलीत एक व्यक्ती ऑस्ट्रेलियातून आल्यावर आपल्या राहत्या घरी आली होती. मात्र, त्या इमारीतीतील रहिवाशांनी कोरोनाच्या संशयातून त्यांना इमारतीत राहण्यास प्रतिबंध केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
मात्र, ही घटना समजताच पोलिसांना डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी मध्यस्थी करत त्या ऑस्ट्रेलियातून आलेल्या नागरिकाला पोलीस ठाण्यात बोलावले. विमानतळावर आपली वैद्यकीय तपासणी केल्यावर कोरोना झाला नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, रहिवाशांचा संताप पाहता पोलिसांनी त्या व्यक्तीस काही दिवसांसाठी डोंबिवलीत राहू नका, पुन्हा एकदा मुंबईतील कस्तुरबा रूग्णालया तपासणी करा, असा सल्ला दिला. मात्र, त्या व्यक्तीने दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश अहेर यांनी पत्रकारांना दिली.