ठाणे:आताच्या फास्ट जगात सन उत्सव हे देखील हायटेक झालेले पाहायला मिळत आहे. त्यापैकीच दिवाळी हा सण देखील आहे. Readymade Forts सुट्टीत दिवाळीच्या आधीच किल्ले तयार करण्यासाठी बच्चे कंपनीला अनेक पालक देखील वर्षानुवर्षे मदत करताना पाहायला मिळत होते. मात्र शहरी भागात आवश्यक साहित्य उपलब्ध होत नसल्याने आता बच्चे कंपनीने आता रेडीमेड किल्ल्यांकडे आपला मोर्चा वळवलेला पाहायला मिळत आहे.
रेडिमेड किल्लांची नागरिकांची मागणी अनेक वर्षांपासून दिवाळीच्या उत्सवात किल्ले तयार करण्याची त्यासाठी साहित्याची जमवाजमव करण्यासाठी येणाऱ्या अडचणी पाहता, मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण Online education घेणाऱ्या मुलानी आता रेडीमेड शिवाजी महाराजांच्या मूर्ती आणि मावळ्यांसह संपूर्ण किल्ल्याच रेडिमेड घेण्यास पसंती दिली आहे. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असताना हे किल्ले बनवणारे कलाकार देखील आपले काम लवकरात लवकर पूर्ण करून या मुलांना आनंद देण्याचा प्रयत्न करत आहेत.
पालकांची डोकेदुखी संपलीया रेडिमेड किल्ल्यांमुळे आता पालकांना देखील उत्सवाच्या खरेदीसाठी वेळ मिळणारं आहे. माती गोळा करून दगडांच्या मदतीने किल्ले तयार करण्यासाठी लागणारा वेळ आणि मेहनत वाचणार आहे. पालकांचा कल देखील या रेडीमेड किल्ल्याकडे वाढत आहे. आता बाजारात रेडिमेड किल्ले आणि सर्वच साहित्य उपलब्ध होत असल्यामुळे पालकांनी देखील निश्वास सोडला आहे.
महाराजांचा इतिहास समजावा हा प्रयत्नहे किल्ले तयार करणारे कलाकार गणेशमूर्ती, देवीमूर्ती तयार करत होते, पण नागरिकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी किल्ले तयार करण्यास सुरवात केली आहे. पण त्यांनी देखील शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचे टीम वर्क हे लहानपणापासून समजावे म्हणून ही किल्ल्यांची संस्कृती टिकवली पाहिजे असे मत मांडले आहे.
मोबाईलवर खेळापासून मुक्तीमैदानात होणारे काही ठराविक खेळ सोडले, तर आता लहानमुळे दिवसभर मोबाईल आणि त्यांच्यावर असलेल्या गेम्सवर भर देत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने का होईना, त्यांना माती सोबत आपले नाते जपता येते आणि मेहनत घ्यावी लागते. हे पाहून पालक देखील खुश होत आहेत. या कामामुळे मोबाईल पासून थोडा वेळ का होईना विध्यार्थी दूर राहातं, असल्याचे समाधान पालकांना आहे.