महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane News : मनोरूग्णाने तरूणीचा पाठलाग करत काढली छेड अन् नागरिकांनी दिला चोप

तरूणी तिच्या कार्यलयापर्यंत पाठलाग करणाऱ्या तरूणी रिक्षातून उतरून तिच्या ऑफिस कार्यलयापर्यंत जात असताना मनोरूग्णाने तिचा पाठलाग केला. तरूणीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा कला. यादरम्यान, मनोरूग्णाला नागरिकांनी चोप देऊन नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Thane News
मनोरूग्ण पोलिसांच्या ताब्यात

By

Published : Mar 28, 2023, 10:03 PM IST

ठाणे :नौकरी करीत असलेल्या ठिकाणी रिक्षातून उतरून जात असताना पाठलाग करणाऱ्या आणि तरुणीच्या कार्यालयापर्यंत पोहचणाऱ्या मनोरुग्णाला तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी चोप देऊन नौपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान सदर तरुण हा मनोरुग्ण असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली आहे. संबंधित घटना मंगळवारी (28 मार्च) रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास चंदनवाडी, पाचपाखाडी येथे घडली. पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविल्याची माहिती दिली आहे.

मनोरूग्णाला दिला चोप : आपला कुणीतरी पाठलाग करतो आहे. याची जाणीव झाल्यानंतर तरुणीने मार्ग बदलत आपल्या कार्यालयात आली. मात्र मनोरुग्ण हा तरुणीच्या मागे कार्यालयापर्यंत पोहचला. घाबरलेल्या तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक नागरिक जमले. त्यांना पाहून मनोरुग्ण हा पळून जाऊ लागला. त्याला पकडून नागरिकांनी चोप दिला. त्यानंतर नौपाडा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. तर मनोरुग्ण असल्याने त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, या मनोरूग्णावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

ठाण्यात लोकलमध्ये दिव्यांगाला पेटवले :ठाण्यात लोकल रेल्वे ने प्रवास करणाऱ्या एका दिव्यांग व्यक्तीला एक अल्पवयीन दिव्यांग मुलाने पेटवल्याची धक्कादायक घटना घडली होती. ठाणे जिल्ह्यातील कळवा ते मुंब्रा स्थानकाच्या दरम्यान शनिवारी दिव्यांग प्रमोद वाडेकर (35) याच्या अंगावर पेटता रुमाल टाकला. यामुळे दिव्यांग वाडेकर हा जखमी झाला होता. त्याच्या डावा हात भाजला गेला. यादरम्यान, आग विझविण्याच्या खटाटोपात उजवा हात जखमी झाला. विकलांग अल्पवयीन आरोपीने मुंब्रा स्थानकावरून पसार झाला. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी आरोपीला 24 तासाच्या आत अटक केली. दरम्यान, त्याच्या चौकशीत त्याच्यावर यापूर्वीच मोबाईल चोरीचे दोन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले होते. तर विकलांग आरोपी हा नशेडी असून नशेची झिंग पुरविण्यासाठी तो सोल्युशन या ज्वलनशील पदार्थाचा वापर करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. घटनेच्या दिवशी त्याच्याकडे नशेसाठी असलेले सोल्युशन रुमालावर टाकून पेटवून रुमाल दिव्यांग वाडेकर याच्या अंगावर टाकला आणि घटना घडली होती.

हेही वाचा : MNS Protest Against Hawkers : फेरीवाला मुक्त परिसराची डेडलाईन संपली; मनसे स्टाईलने आंदोलनाला सुरूवात

ABOUT THE AUTHOR

...view details