ठाणे : घरासमोरील उघड्या गटारात पडून दीड वर्षांचा बालकाचा मृत्यू (Child dies after falling into open drain) झाल्याची घटना लक्ष्मी पूजनाच्या दिवशी भिवंडी शहरातील अजमेर नगर परिसरात घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी नारपोली पोलीस ठाण्यात गटाराचे काम करणाऱ्या दोन ठेकेदारांसह (case filed against drain contractor) महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंत्या विरोधात (case filed against deputy engineer) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल (case of culpable homicide registered) करण्यात आला आहे. मुक्तदिर बुबेरे आणि प्रवीण सूर्यराव असे गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदारांची नावे आहेत. प्रथमेश यादव असे उघड्या गटारात पडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
Child Died In Open Sewer : उघड्या गटारात पडून बालकाचा मृत्यू; दोन ठेकेदारासह महापालिकेच्या उपअभियंत्यावर गुन्हा दाखल
घरासमोरील उघड्या गटारात पडून दीड वर्षांचा बालकाचा मृत्यू (Child dies after falling into open drain) झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी नारपोली पोलीस ठाण्यात गटाराचे काम करणाऱ्या दोन ठेकेदारांसह (case filed against drain contractor) महापालिकेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंत्या विरोधात (case filed against deputy engineer) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल (case of culpable homicide registered) करण्यात आला आहे.
खेळताना उघड्या गटारात पडला-भिवंडीतील अजमेरनगर भागात मृत बालक आईवडील व बहिणी सोबत राहत होता. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मृत बालकाच्या बहिणीचा वाढ दिवस होता. त्यामुळे यादव कुटूंब त्या कार्यक्रमाच्या गडबडीत होते. तर मृतक प्रथमेश हा दुपारच्या सुमारास घरासमोर खेळत होता. खेळताना अचानक उघड्या गटारात पडला. मात्र घरात वाढदिवस असल्याने प्रथमेश गटारात पडल्याचे कोणाच्या तातडीने लक्षात आले नाही. मात्र काही वेळानंतर तो दिसत नसल्याने त्याची शोधाशोध नातेवाईक करीत असताना मृत प्रथमेश घरासमोरील गटारात पडल्याचे आढळून आले.
अपूर्ण कामामुळे गेला बालकाचा जीव-भिवंडी महापालिकेतर्फे यादव यांच्या चाळीत गटारांची कामे नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. मात्र रहिवासी वस्तीतून जाणाऱ्या या गटारींवर अनेक ठिकाणी झाकण अथवा लादी बसविली नव्हती. स्थानिक रहिवाश्यांकडून याबाबत वारंवार तक्रार देखील करण्यात येत होती. मात्र याकडे पालिका बांधकाम विभाग व ठेकेदार दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रथमेशचा उघड्या गटारातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकचे वडील कमलेश यादव यांनी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरु केल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली आहे.