ठाणे - भिवंडी शहरातील बाला कंपाऊंड परिसरात नाल्याला कठडा नसल्याने प्रवशांना घेऊन जाणारी ओला कार अडकल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, परिसरातील नागरिकांनी लगेच कार मागच्याबाजूला ओढून प्रवाशांना बाहेर काढल्याने दुर्घटना टळली.
कठडा नसलेल्या नाल्यात प्रवाशांसह कार अडकली; प्रवासी सुखरूप
कार अडकल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासन या नाल्याच्या कामाकडे लक्ष देईल का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
शहरात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बाला कंपाऊंड परिसरातील नाल्यावरून पाणी वाहत होते. या नाल्याला कठडेदेखील नाही. त्यामुळे नाल्यावरून पाणी वाहताना नाला आणि रस्त्यामधील फरक समजत नाही. शुक्रवारीदेखील कार चालकाला नाल्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे कार नाल्यात अडकली. मात्र, परिसरातील नागरिकांनी कारला मागे ओढले. त्यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे दुर्घटना टळली. यामुळे आता तरी महापालिका प्रशासन या नाल्याच्या कामाकडे लक्ष देईल का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.