ठाणे- उल्हासनगरातील एका पेट्रोल पंपावर कारला अचानक लागल्याची घटना घडली. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, कारचालक आणि पेट्रोल पंपवारील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.
उल्हासनगरात पेट्रोल पंपावरच कारने घेतला पेट; चालकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
उल्हासनगर 17 सेक्शन परिसरात आज दुपारच्या सुमारास एक व्यक्ती मारुती सुझुकी कार पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंप घेऊन गेला होता. त्याच सुमाराला अचानक कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि कारला आग लागली.
उल्हासनगर 17 सेक्शन परिसरात आज दुपारच्या सुमारास एक व्यक्ती मारुती सुझुकी कार पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंप घेऊन गेला होता. त्याच सुमाराला अचानक कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि कारला आग लागली. मात्र, पेट्रोल पंपावरील कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी पेट्रोल पंपावर असलेल्या आग प्रतिबंधक यंत्राद्वारे आग आटोक्यात आणली. त्यानंतर कार धक्का देत पेट्रोल पंपाबाहेर काढण्यात आली. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारमधील बॅटरीचे शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान या घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक अर्ध्या तासासाठी ठप्प झाली आहे.