महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भिवंडीत 'रेझिंग डे' सप्ताह उत्साहात, पोलीस बँड पथकाने वाजविल्या सुरेल सुरावटी

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात पोलीस प्रशासनाकडून 'रेझिंग डे सप्ताह' साजरा करण्यात आला. यावेळी भिवंडी शहर पोलीस ठाणे आणि भोईवाडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली पोलीस बँड पथकाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

thane
'रेझिंग डे'निमित्त भिवंडीत पोलीस बँड पथकाचा विशेष कार्यक्रम

By

Published : Jan 6, 2020, 11:04 AM IST

ठाणे -'रेझिंग डे'निमित्त भिवंडीत पोलीस बँड पथकाने सुरेल सुरावटीतून राष्ट्रभक्तीपर गीतांच्या धून वाजविल्या आहे. पोलीस बँड पथकाने सादर केलेली राष्ट्रभक्ती गीते ऐकण्यासाठी नागरिक व पोलीस कर्मचारी याठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित झाले होते.

'रेझिंग डे'निमित्त भिवंडीत पोलीस बँड पथकाचा विशेष कार्यक्रम

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात पोलीस प्रशासनाकडून 'महाराष्ट्र पोलीस वर्धापन सप्ताह' साजरा केला जातो. यादरम्यान समाजातील विविध घटकातील वर्गांसोबत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, पोलीस प्रशासनाबद्दलची माहिती देत समाजाशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी भिवंडी शहर पोलीस व भोईवाडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली शहरातील धामणकर नाका येथे पोलीस बँड पथकाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा - मिनी बसमध्ये नाग शिरल्याने चालकासह प्रवाशांची उडाली भंबेरी

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे आणि कल्याणराव कर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस बँड पथक प्रमुख सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुरेल सुरावटीतून राष्ट्रभक्तीपर गीतांच्या धून वाजविल्या. त्या ऐकण्यासाठी असंख्य नागरीक व पोलीस कर्मचारी याठिकाणी मोठ्या संख्येने एकत्रित झाले होते.

हेही वाचा -ठाण्यात माजी नौदल अधिकाऱ्याचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

ABOUT THE AUTHOR

...view details