महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Thane Crime Case : 'पठाण' चित्रपट सुटताच चित्रपटगृहाच्या दारातच पतीचे फोडलं डोक; पत्नीलाही जबर मारहाण

'पठाण' चित्रपट सुटताच, चित्रपटगृहाच्या दारात पतीचे फोडलं डोक; पत्नीलाही जबर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ठाणेमध्ये घडला. हल्ला करणाऱ्या अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच कुटुंबातील अनेक जणांनी मिळून हा हल्ला केला. या हल्ल्यामुळे घाबरलेले हुनेरकर दाम्पत्य पळून गेले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

As soon as the movie 'Pathan' was Released, the husband's head was smashed at the door of the theater; Beating the wife too; A case has been filed against many people in the same family
'पठाण' चित्रपट सुटताच चित्रपटगृहाच्या दारातच पतीचे फोडलं डोक; पत्नीलाही जबर मारहाण

By

Published : Feb 1, 2023, 10:35 PM IST

ठाणे : देशभर सुपरहिट ठरलेल्या 'पठाण' चित्रपट बघण्यासाठी गेलेल्या पती-पत्नीला शुल्लक कारणावरून वाद घालत एकाच कुटुंबातील काही जणांनी मिळून चित्रपटगृहाच्या दरवाजात जबर मारहाण केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे पती-पत्नी लिफ्टने चित्रपटगृहाच्या खाली येताच हल्लेखोर कुटुंबाने लोखंडी रॉड आणि सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने पतीच्या डोक्यात प्रहार करून गंभीर जखमी केले. तर पत्नीलाही हल्लेखोरांसोबत असलेल्या महिलांनी जबर मारहाण केली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील सर्वेद्य मॉलमधील चित्रपटगृहाच्या दारात घडली आहे.

ठाण्यात हल्लेखोर कुटुंबावर भादंविमधील अर्धा डझन :याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात हल्लेखोर कुटुंबावर भादंविमधील अर्धा डझन विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभाकर म्हात्रे, दुर्वेश म्हात्रे, प्रसाद म्हात्रे आणि त्यांच्यासोबत असलेल्या तीन महिला, असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर कुटुंबाचे नाव आहे. तर नदीम आदाम हुनेरकर (वय ३०) असे गंभीर जखमी पतीचे नाव आहे.

कल्याण पश्चिम भागातील बैलबाजार परिसरात असलेल्या :सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम भागातील बैलबाजार परिसरात असलेल्या सर्वेद्य मॉल असून, या मॉलमध्ये एसएम ५ चित्रपटगृहात आहे. या चित्रपटगृहात सध्या फिल्मी दुनियेत चर्चेत असलेला शाहरुख खान या अभिनेत्याचा पठाण चित्रपट चित्रपटगृहाच्या स्क्रीनवर सुरू आहे. त्यातच कल्याण पश्चिम भागातील पॅराडाईज संकुलमध्ये राहणारे हुनेरकर दाम्पत्य ३० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास चित्रपट सुटण्याआधी हल्लेखोरांमधील एकाने जखमी नदीम यांच्या पत्नीस 'क्या चायना डुप्लीकेट माल लाया है', असे बोलताच पत्नीने वाद घालताच हल्लेखोर कुटुंबाने पत्नी व पतीला चित्रपट गृहात मारहाण केली.

खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार :कुटुंबाच्या मारहाणीमुळे पती-पत्नी घाबरून लिफ्टने चित्रपटगृहाच्या मुख्य प्रवेशदारात येताच, हल्लेखोर म्हात्रे कुटुंबानी पुन्हा गाठले. आणि पतीवर लोखंडी रॉड व पेव्हर ब्लॉक डोक्यात मारून गंभीर दुखापत केली. त्यानंतर चित्रपटगृहातील सुरक्षा रक्षकानी मध्यस्थी केल्याने हल्लेखोरानी पती व पत्नीला मारहाण करणे थांबले होते. दरम्यान, पतीवर एका खासगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर ३१ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास हल्लेखोर म्हात्रे कुटुंबावर भादंवि कलम ३२६, २२३, ५०४, १४३, १४७, १४१, प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास ढोले करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details