महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तीन तासांच्या पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे हाल कळतील का? - अनिल बोंडे

नवी मुंबईतील पनवेल तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान झाले आहे. याच नुकसानीची पाहणी माजी कृषीमंत्री अनिल बोंडेंनी केली आहे.

By

Published : Oct 19, 2020, 9:01 PM IST

अनिल बोंडे
अनिल बोंडे

नवी मुंबई - पनवेल तालुक्यातील गिरवले गावात किसान संवाद सभेचे आयोजन करत नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी करण्यात आली. किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी स्थानिक भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पाहणी दौरा केला. गिरवली गावातील प्रगत शेतकरी आत्माराम हातमोडे यांच्या शेतावर जाऊन शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत, विविध सरकारी योजनांबाबत मार्गदर्शनही करण्यात आले.

माजी मंत्री अनिल बोंडेआणि स्थानिकांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पनवेल परिसरातील भातशेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले व गावातील शेतकऱ्यांशी त्यांनी सवांद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तीन तासांच्या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान कधीही कळणार नाही. पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, असेही वक्तव्य डॉ. बोंडे यांनी केले. त्याचबरोबर 10 ते 12 शेतकऱ्यांना चेक वाटले म्हणजे सरसकट मदत दिली असे होत नाही. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा -'साहेब एवढ्यात काय होणार?'...नुकसान भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details