महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोनाबाबत सर्व सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करुन देणार'

बदलापूर अंबरनाथमधील रुग्णांना शहरातच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, जेणेकरुन येथील रुग्णांना मुंबईवर अवलंबून रहावे लागणार नाही. बदलापूर जवळील हर्णे आयुर्वेदिक कॉलेज जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहे.

rajesh-tope
'कोरोनाबाबत सर्व सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करुन देणार'

By

Published : Jul 3, 2020, 12:52 PM IST

ठाणे- कोरोनाची साखळी शक्य तितक्या लवकर तोडण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. बदलापूर अंबरनाथ ग्रामीण भागासाठी पाच चाचणी केंद्र सुरू करण्यात येतील. तसेच येत्या दहा दिवसात कोरोनाला आळा घालणाऱ्या सर्व सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करुन देणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोना साथीच्या संदर्भात बदलापुरात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.


बैठकीला जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारी जगत सिंग गिरासे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, उपसंचालक गौरी राठोड, डॉ.मनीष रेगे, पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे, अंबरनाथ, बदलापूर नगरपरिषद मुख्याधिकारी दीपक पुजारी, डॉ.प्रशांत रसाळ उपस्थित होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बदलापूर पालिकेत सर्व संबंधित अधिकारी, मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करुन सर्व अडचणी समजून घेतल्या.

'कोरोनाबाबत सर्व सुविधा जिल्ह्यात उपलब्ध करुन देणार'


बदलापूर अंबरनाथमधील रुग्णांना शहरातच सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, जेणेकरुन येथील रुग्णांना मुंबईवर अवलंबून रहावे लागणार नाही. बदलापूर जवळील हर्णे आयुर्वेदिक कॉलेज जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. तेथे पन्नास बेडचे आयसीयू सुविधा असलेले रुग्णालय लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश टोपे यांनी संबंधित यंत्रणेस दिले.

एमएमआर रिजनमध्ये कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत. याची रोजची अपडेट जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या कळावी यासाठी डॅशबोर्ड तयार करुन त्यावर माहिती उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.


कोरोनाचे रुग्ण सापडल्यावर त्यासलंग्न असलेल्या रुग्णांची ट्रेसिंग करण्याबाबतही पालिका प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्या अनुषंगाने कडक व तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अलगिकरण कक्ष वाढवण्याची आवश्यकता लक्षात घेऊन या परिसरातील महाविद्यालय, हॉटेल आदी सर्व आस्थापनांशी चर्चा करुन त्या जागा ताब्यात घेण्यावर भर देण्यात यावा. रुग्णवाहिन्यांबाबत राज्य शासनाने आदेश काढले आहेत. त्याप्रमाणे खासगी वाहने व रुग्णवाहिन्या ताब्यात घेऊन रुग्णांना विनामूल्य सेवा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, असेही टोपे यांनी सांगितले.

ज्यादा दर लावणाऱ्या खाजगी हॉस्पिटल वर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. अंबरनाथ येथील डॉ. बी जी छाया उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टर उपलब्ध व्हावेत यासाठी नवीन पदवी प्राप्त डॉक्टर तसेच बीएमएस डॉक्टरांची सेवा घ्यावी असे निर्देश टोपे यांनी दिले. तर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details