मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा रोड पूर्वेला नया नगरमध्ये असलेल्या बानेगर शाळेच्या मनमानी कारभाराबाबत पालक आणि विद्यार्थी यांनी पालिका मुख्य प्रवेशद्वारवर ठिय्या मांडला. यावेळी घटनास्थळी भाईंदर पोलीस दाखल झाले होते. याबाबत प्रशासन बोलण्यास तयार नाही. मात्र, जोपर्यंत बानेगर शाळेवर कारवाई करत नाही तोपर्यंत पालिका मुख्यालय सोडणार नाही असं पालकांकडून सांगण्यात आले आहे.
परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे यांनी हेही वाचा -नाराज संग्राम विधानसभा अध्यक्ष होणार ?
मीरा रोड पूर्वेला असलेल्या बानेगर शाळा प्रशासन विद्यार्थी व पालकांकडे गेल्या वर्षाची फी तसेच या वर्षी देखील अतिरिक्त फी वाढवण्यात आली आहे. फी देत नाही तर परीक्षेला बसवले जाणार नाही असं बानेगर शाळेकडून सांगण्यात आले आहे. तसेच आज अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्यात आले नाही. याच कारणामुळे मनपा आयुक्त व शिक्षण अधिकारी यांच्या विरोधात पालकांनी ठिय्या मांडला आहे.
हेही वाचा -फडणवीस सरकारमुळेच मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात - अशोक चव्हाण