ठाणे - निवडणुका लागायला अजुन वेळ आहे, ज्या वेळी निवडणुका लागतील त्यावेळी ठरवू, जो लोकांचा आदेश आहे तसे मी करेन, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले. ठाण्यातील आंनद दिघे क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरे आले होते.
भाजपच्या जागेवर सेनेच्या उमेदवाराला तयारी करण्याचा आदित्य ठाकरे यांचा सल्ला
ठाण्याचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या प्रभागात हे संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची कोपरी पाचपखाडी मतदारसंघाची तिकीट नक्की कोणाला मिळणार असा नवीन वाद आदित्य ठाकरे तयार करून गेले.
ठाण्याचे सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या प्रभागात हे संकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची कोपरी पाचपखाडी मतदारसंघाची तिकीट नक्की कोणाला मिळणार याबाबतचा नवीन वाद आदित्य ठाकरे तयार करून गेले.
गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे यांना इथे उमेदवारी दिली जात आहे. मात्र, मस्केजी तुम्ही इथून तिकीट मागू शकता, एकनाथ शिंदे यांना कुठेही उमेदवारी दिली तरी ते निवडून येतील, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या ठाणे शहर या जागेवर आदित्य ठाकरे यांनी तयारीचे आदेश दिल्यामुळे आता भाजपकडून नक्कीच तिखट प्रतिक्रिया येण्याची चिन्हे आहेत. पण, खुद्द आदित्य ठाकरे यांनी या प्रकारचे वक्तव्य केल्यामुळे युती राहील की नाही यावर मात्र संशय आहे.