महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकी जाळणारा गजाआड

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका दुचाकी जळणाऱ्या गोपाळ किशोर पाटील (वय 21 वर्षे, रा.देवजीनगर) आरोपीला भोईवाडा पोलिसांनी गजाआड केले.

By

Published : Dec 19, 2019, 2:41 AM IST

आरोपीसह पोलीस
आरोपीसह पोलीस

ठाणे- सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी एका दुचाकी जळणाऱ्या आरोपीला भोईवाडा पोलिसांनी गजाआड केले. गोपाळ किशोर पाटील (वय 21 वर्षे, रा.देवजीनगर) असे दुचाकी जळीत कांडात अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


भिवंडीतील गंगारामवाडी गेटजवळ दोन दिवसांपूर्वी दुचाकीतील पेट्रोल संपल्याने रस्त्यावर उभी करूनशिवकुमार हा घरी गेला होता. त्यावेळी या मोटार सायकलला अनोळखी व्यक्तीने आग लावून पेटवून दिली होती. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.


या जळीत प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात दुचाकी मालक शिवकुमार मनोज शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सखोल तपास करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी गोपाळ किशोर पाटील यास बुधवारी (दि. 19 डिसें) ताब्यात घेऊन अटक केली आहे.

हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवून विवाहीत प्रियकराचा तरुणीवर अत्याचार

ABOUT THE AUTHOR

...view details