नवी मुंबई - नवी मुंबईतील बेलापूर येथील उड्डाणपुलाखालील सीबीडी सर्कल जवळ पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या तीन गाडय़ांचा एकाच वेळी विचित्र पध्दतीने अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.
नवी मुंबईतील सीबीडीमध्ये 3 गाडय़ांचा विचित्र अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही - नवी मुंबई अपघात
गाडी चालकाचा अंदाज चुकल्याने बेलापूर येथील उड्डाणपुलाखालील सीबीडी सर्कल जवळ पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या तीन गाडय़ांचा एकाच वेळी विचित्र पध्दतीने अपघात झाला.

नवी मुंबईतील सीबीडीमध्ये 3 गाडय़ांचा विचित्र अपघात; सुदैवाने जीवितहानी नाही
चारचाकी गाडी चालकाला अंदाज चुकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. सीबीडी पुलाच्या बाजूला एक गाडी खाली कोसळल्याने तर इतर दोन गाडय़ा रस्त्यावरच एकमेकांना ठोकल्या गेल्या. यामुळे विचित्र पध्दतीने भीषण अपघात झाला. वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी स्थळी पोहोचवून अपघातग्रस्त गाडीत अडकून पडलेल्यांना जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये नेले.