ठाणे- एका भामट्याने शक्कल लढवत व्यक्तीच्या मित्रासह त्याच्या पत्नीचा व्हॉट्सऍपवर प्रोफाईल फोटो ठेवून फसवणूक केली आहे. यात 3 लाख 65 हजार रुपयांचा चुना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या डोंबिवलीकराने सायबर गुन्ह्यासह ४२० चा गुन्हा टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. जीत दयाराम परमार (49) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
डोंबिवलीत व्हॉट्सऍपवर प्रोफाईल फोटो ठेवून 3 लाख 65 हजाराची फसवणूक हेही वाचा-महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या 'या' दिग्गज नेत्यांची भासणार उणीव
डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी येथील सर्वोदय गार्डनमध्ये जीत दयाराम परमार राहतात. त्यांचा मित्र शंभूनाथ झा व त्यांच्या पत्नीचा प्रोफाईल फोटो ठेवून एका अनोळखी मोबाईलधारकाने मेहुणीच्या हार्टच्या ऑपरेशनसाठी पैशांची गरज असल्याचे सांगत परमार यांना फोन, मॅसेज करुन पैसे मागितले. त्यानुसार त्यांनी पाठविलेले 3 लाख 65 हजार रुपये ट्रान्स्फर करुन घेवून फसवणूक केली. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार टिळक नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-पीएमसी बँकेवर कारवाईचा बडगा, ६ महिन्यांसाठी आरबीआयने व्यवहार थांबवले
दरम्यान, ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसागणिक कमालीची वाढ होत आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील तक्रारीच्या नोंदीही झाल्या आहेत. विशेष म्हणजे वेळोवेळी पोलीस प्रशासन व विविध सामाजिक संघटना सायबर गुन्हे कसे घडतात. त्यापासून नागरिकांनी कसे सावध राहावे. यासाठी जनजागृती करीत असतात. मात्र, तरीही सायबर गुन्हे करणारे गुन्हेगारांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. यामुळे अशा गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक नसल्याचा आरोप फसवणूक झालेले नागरिक करताना दिसत आहेत.