महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीत नव्याने ८ कोरोनाबाधित रुग्णांची भर, एकूण आकडा १३७वर

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी मुंबईतील परिवहन सेवेतील एक चालक तर मुंबई येथील खासगी बॅंकेचा कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर 2 रुग्ण मुंबईतील खासगी रुग्णालयातील कर्मचारी आहेत. तर 4 रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या निकट सहवासातील असल्याचे समोर आले आहे.

137 corona positive cases in kalyan dombivali
कल्याण डोंबीवलीत नव्याने ८ कोरोनाबाधित रुग्णांची भर

By

Published : Apr 27, 2020, 5:37 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या चिंता वाढणारी आहे. आज (सोमवार)देखील नव्याने ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या वाढून १३७वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या रुग्णांपैकी ४५ जण बरे झाले आहेत. तर सध्याच्या स्थितीत ८९ रुग्णांवर विविध रुग्नालयात उपचार सुरू असून, आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.


कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आज आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी मुंबईतील परिवहन सेवेतील एक चालक तर मुंबई येथील खासगी बॅंकेचा कर्मचाऱ्याचा समावेश आहे. तर 2 रुग्ण मुंबईतील खासगी रुग्णालयातील कर्मचारी आहेत. तर 4 रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या निकट सहवासातील असल्याचे समोर आले आहे.


आज आढळलेले आलेले रुग्ण


१ ) पुरुष ३८ वर्षे (डोंबिवली पूर्व) मुंबई येथील शासकीय परिवहनचा चालक
२ ) पुरुष २१ वर्षे (कल्‍याण (प)) मुंबई येथील खासगी बॅंकेचा कर्मचारी
३ ) पुरुष ३४ वर्षे (कल्‍याण पूर्व) मुंबई येथील खासगी रुग्‍णालयातील कर्मचारी
४ ) मुलगा १३ वर्षे (डोंबिवली (प)) कोरोनाबाधित रुग्‍णाचा सहवासि
५ ) महिला ४८ वर्षे (डोंबिवली (प)) कोरोन बाधित रुग्‍णाचा सहवासित
६ ) मुलगी ७ वर्षे (मोहना) कोरोना बाधित रुग्णाचा निकट सहवासी
७ ) महिला ३२ वर्षे ‍(मोहना) कोरोना बाधित रुग्णाचा निकट सहवासीत
८ ) पुरुष ४० वर्षे (डोंबिवली (प)) खासगी रुग्‍णालयातील स्‍टाफ नर्स


दरम्यान, आतापर्यंत ४ हजार ९९८ रुग्‍णांना होम क्‍वारंटाईन केले असून ९६ रुग्‍ण इस्‍टीटयुशनल क्‍वारंटाईनमध्‍ये आहेत. तसेच आत्तापर्यंत कल्याण पूर्वेत २८ रुग्ण, कल्याण पश्चिम १६ रुग्ण, डोंबिवली पूर्वमध्ये ४८ रुग्ण, डोंबिवली पश्चिमेत ३५ तर मांडा टिटवाळा आणि मोहने परिसरात प्रत्येकी ५ रुग्ण आढळून आल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details