महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे नव्याने १३ रुग्ण... संख्या १५६वर

१५६ रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णांच्या निकट सहवासातील आहे. तर गेल्या ४ ते ५ दिवसांपासून आढळून येत असलेले काही रुग्ण मुंबईतील विविध अतिआवश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी आहेत. यामध्ये आरोग्य, पोलीस, बँक, पत्रकार यांचा समावेश आहे.

13-more-corona-patient-tested-positive-in-thane
13-more-corona-patient-tested-positive-in-thane

By

Published : Apr 29, 2020, 4:55 PM IST

ठाणे- कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात बुधवारी नव्याने १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता रुग्णांची संख्या १५६वर पोहचली असून यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-Global COVID-19 Tracker: जगभरात ३१ लाख ३८ हजार बाधित, तर २ लाख १७ हजार ९८५ दगावले

विशेष म्हणजे १५६ रुग्णांपैकी अर्ध्याहून अधिक रुग्ण हे कोरोनाबाधित रुग्णांच्या निकट सहवासातील आहे. तर गेल्या ४ ते ५ दिवसांपासून आढळून येत असलेले काही रुग्ण मुंबईतील विविध अतिआवश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी आहेत. यामध्ये आरोग्य, पोलीस, बँक, पत्रकार यांचा समावेश आहे.

आज कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची विगतवारी खालीलप्रमाणे...

1) महिला २९ वर्षे (डोंबिवली प.) कोरोनाबाधित रुग्‍णाचा सहवासित.
2) मुलगा १३ वर्षे (डोंबिवली पूर्व) कोरोनाबाधित रुग्‍णाचा सहवासित.
3) महिला ३६ वर्षे (डोंबिवली प.) कोरोनाबाधित रुग्‍णाचा सहवासित.
4) मुलगा १० वर्षे (डोंबिवली प.) कोरोनाबाधित रुग्‍णाचा सहवासित.
5) पुरुष ४२ वर्षे (कल्‍याण प.)) मुंबई येथील ईसिजी टेक्नीशियन.
6) महिला ४० वर्षे (डोंबिवली पूर्व) मुंबई येथील शासकीय रुग्णालयातील नर्स.
7) पुरुष ४४ वर्षे (डोंबिवली पूर्व) मुंबई येथील पोलिस कर्मचारी.
8) पुरुष ५० वर्षे (कल्याण प.) मुंबई येथील कर्मचारी.
9) पुरुष ३७ वर्षे (डोंबिवली प.) मुंबई येथील आरोग्य कर्मचारी.
10)पुरुष ३६ वर्षे (कल्याण प.) मुंबई येथील फार्मा. कंपनीतील कर्मचारी.
11) महिला ५७ वर्षे (डोंबिवली पूर्व) मुंबई शासकीय रुग्णालयातील नर्स.
12)पुरुष ४६ वर्षे (डोंबिवली पूर्व)मुंबई येथील शासकीय कामगार.
13) महिला ६० वर्षे (कल्याण पूर्व). तापाच्या दवाखान्यातील रुग्ण.
दरम्यान, महापालिका क्षेत्रातील आतापर्यत ४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १०७ आहे. तर १५६ रुग्णांपैकी कल्याण पूर्वेतील ३० रुग्ण, कल्याण पश्चिमेला २०, डोंबिवली पूर्व ५५, डोंबिवली पश्चिम ३९, मांडा-टिटवाळा ५, मोहने ६, आणि नांदिवली १ रुग्ण असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details