महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायतीत दारूची पार्टी करणे भोवले; ग्रामविकास अधिकारी निलंबित

ग्रामपंचायत कार्यालयात दारूची पार्टी करणारे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर यांना निलंबित करण्यात आले आहे. वैराग ग्रामपंचायत कार्यालयातच दारूची पार्टी रंगल्याचा व्हिडिओ काढून गावकऱ्यांनी याबाबत तक्रार केली होती.

Solapur
ग्रामपंचायतीत रंगलेली पार्टी

By

Published : May 30, 2020, 3:14 PM IST

सोलापूर- कोरोनाच्या काळात ग्रामपंचायत कार्यालयात दारूची पार्टी करणारे ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर यांना निलंबित करण्यात आले आहे. वैराग ग्रामपंचायत कार्यालयातच दारूची पार्टी रंगल्याचा व्हिडिओ काढून गावकऱ्यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर कर्मचारी विलास मस्के, अभियंता जाधव आणि लिपीक शेख यांच्याविरूद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीत दारूची पार्टी करणे भोवले; ग्रामविकास अधिकारी निलंबित

सध्या सोलापुरात कोरोनाच्या आजाराने थैमान घातले आहे. आतापर्यंत शहरात असलेला कोरोना आता ग्रामीण भागातही पोहोचला आहे. बार्शी तालुक्यातील वैराग या गावात देखील कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे गाव बंद ठेवण्यात आले होते. गाव बंद असताना देखील ग्रामविकास विकास अधिकारी अनिल बारसकर हे लिपीक, अभियंता, कर्मचारी यांनी मिळून ग्रामपंचायत कार्यालयात दारूची पार्टी करत होते.

गावातील नागरिकांनी दारूची पार्टी सुरू असतानाचा व्हिडिओ काढला आणि याची तक्रार केली. यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी ग्रामविकास अधिकारी अनिल बारसकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तर कर्मचारी विलास मस्के, अभियंता जाधव आणि लिपीक शेख यांच्याविरूद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details