महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर : सांगोल्यातील मोबाईल शोरूम फोडणारे दोन संशयित चोरट्यांना अटक; सहा लाखांचे मोबाइल जप्त

यात सॅमसंग, नोकिया, ओप्पो, रियलमी अशा विविध प्रकारच्या कंपन्यांचे मोबाईल आणि साहित्य मिळून एकूण 10 लाख 69 हजार 44 रुपयांचा ऐवज आणि 1 लाख 62 हजार रुपयांची रोकड असा एकूण 12 लाख 31 हजार 44 रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली, असे त्यांनी सांगितले.

By

Published : Feb 23, 2021, 3:28 PM IST

two mobile theft arrested from sangola
मोबाईल शोरूम फोडणारे दोन संशयित चोरट्यांना अटक

सोलापूर- सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 जानेवारीला एक मोबाईल शोरुममधून मोठी चोरी झाली होती. यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले होते. या चोरीचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने सागर सुनील शेंडगे (वय-31, रा.पुणे) आणि दत्तात्रय शिवाजी गोडसे (वय-20, रा. नरळेवाडी, सांगोला) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 6 लाख 8 हजार 838 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत मोबाईल शोरूम धारक विजय कुंडलिक राऊत यांनी फिर्याद दिली होती.

जप्त करण्यात आलेले साहित्य.

12 लाखांची झालीये चोरी -

सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 जानेवारीला दोन संशयितांनी मोबाईल शोरूम फोडले होते. याबाबत विजय कुंडलिक राऊत यांनी फिर्याद दिली होती. यात सॅमसंग, नोकिया, ओप्पो, रियलमी अशा विविध प्रकारच्या कंपन्यांचे मोबाईल आणि साहित्य मिळून एकूण 10 लाख 69 हजार 44 रुपयांचा ऐवज आणि 1 लाख 62 हजार रुपयांची रोकड असा एकूण 12 लाख 31 हजार 44 रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाली, असे त्यांनी सांगितले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून दोन संशयीत आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 6 लाख 8 हजार 838 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यात 33 मोबाईल, 1 टॅब याचा समावेश आहे.

हेही वाचा -रेखा जरे हत्यांकांड : बाळ बोठेच्या स्टॅंडिंग वॉरंट विरुद्धचा पुनर्निरीक्षण अर्ज फेटाळला

मुंबई ते पुणे व्हाया सांगोला तपास -

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता. स्थानिक गुन्हे शाखेने चोरट्यांचा तपास करत मुंबई, पुणे आणि सांगोला या तीन ठिकाणी तपास केला. यामध्ये सागर शेंडगे आणि दत्तात्रय गोडसे या दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details