सोलापूर- जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय आकडेवारी प्रमाणे एप्रिल महिन्यात 740 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. पण, याबाबत अनेकजण संशय व्यक्त करत आहेत. अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या म्हणण्यानुसार एप्रिल महिन्यात सुमारे 1 हजार 200 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कारण, त्यांना प्रत्येक अंत्यविधीनंतर मानधन मिळतो. यावरून शासकीय आकडेवारीवर संशय व्यक्त केला जात आहे.
आजपर्यंत सोलापूर शहरात 1 हजार 234 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
सोलापूर शहराचे कोरोना अहवाल सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाकडून दररोज दिले जाते. गेल्या वर्षी 12 एप्रिल, 2020 रोजी सोलापूर शहरात पहिला कोरोनाग्रस्त आढळला होता. त्याचा अहवालही त्याच्या मृत्यूनंतर प्राप्त झाला होता. तेव्हापासून अजतागायत 1 हजार 234 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 788 पुरुष आणि 446 स्त्रिया आहेत.
जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या शासकीय आकडेवारीनुसार सोलापूरच्या ग्रामीण भागात सर्वाधिक मृत्यू