महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूरकरांनी संचारबंदीत पोलिसांना सहकार्य करावे, पोलीस अधीक्षकांचे आवाहन

पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 3 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहे. त्यामुळे पंढरपूर शहरात विनाकाण कोणीही फिरु नये व पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.

pandharpur police
pandharpur police

By

Published : Aug 5, 2020, 8:07 PM IST

सोलापूर - पंढरपूर तालुक्यात व शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळ पंढरपूरकरांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी पंढरपूर शहरात विनाकारण येऊ नये, असेही पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले आहे.

जिल्हा प्रशासनाने 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 13 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. या काळात नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे. नागरिकांनी पंढरपूर शहरात विनाकारण येणे टाळावे. वैद्यकीय सेवा, औषध दुकाने, दूध वितरण याशिवाय कोणतीही दुकाने चालू राहणार नाहीत. त्यामुळे तालुक्यातील व्यक्तींनी देखील पंढरपूर शहरात येऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आपल्या कुटुंबातील व्यक्ती आजारी असेल किंवा आजूबाजूची व्यक्ती देखील आजारी असेल तर त्याची माहिती तत्काळ आरोग्य यंत्रणेला द्यावी. आजारी असलेल्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करुन पॉझिटिव्ह असेल तर रूग्णाला त्वरित विलगीकरणात ठेवता येईल. शहरातील नागरिकाव्यतिरिक्त इतरांना विनाकारण प्रवेश मिळणार नाही. पंढरपूर शहरातून जाण्यास बंदी असली तरी शहराच्या बाह्य वळण रस्त्याने प्रवाशांना जाता येणार आहे. नागरिकांनी घरातही मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, वेळोवेळी हात धुण्यासाठी सॅनिटायझर किंवा साबणाचा वापर करण्याचे आवाहनही मनोज पाटील यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details