महाराष्ट्र

maharashtra

पंढरपूर शहराला दररोज 1 हजार लसींचा पुरवठा व्हावा; पंढरपूर नगराध्यक्षांची मागणी

By

Published : May 4, 2021, 5:48 PM IST

पंढरपूर शहरातील नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे झाले आहे. रोज 1 हजार लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर शहराला रोज दोनशे-तीनशे लस रोज मिळत असल्याने नागरिकांना लसीकरण न करता परत जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर शहरसाठी एक हजार लस मिळाव्यात, अशी मागणी नगराध्यक्ष साधना भोसले व अनिकेत मनोरकर यांनी केले आहे.

पंढरपूर नगरपरिषद
पंढरपूर नगरपरिषद

पंढरपूर (सोलापूर) -राज्यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती बिकट झाली आहे. आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडला आहे. यातच 1 मे पासून राज्य सरकारकडून 18 ते 40 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले आहे. त्यामुळे पंढरपूर शहरातील एक लाख नागरिकांसाठी रोज एक हजार लसींचा पुरवठा करण्याची मागणी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष साधना भोसले व मुख्यधिकारी अनिकेत मनोरकर यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडे केले आहे.

रोज तीनशे लसींचा पुरवठा

सध्या संपुर्ण भारतासह महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सोलापूर जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या अस्तित्वात असलेली आरोग्य सुविधा, कोविड केअर सेंटर, हॉस्पिटल अपुरी पडत आहे. त्यामुळे त्यांच्यावर खुप ताण पडत आहे. शहराची लोकसंख्या 1 लाख असून शासनाकडुन सात दिवसातुन फक्त 200 ते 300 लसीचा पुरवठा नगरपरिषदेला सध्या होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने स्थापन केलेल्या लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. नागरिकांना लस न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. दररोज लसीकरण केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लसीकरणाचे डोस वाढवावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक नुकतीच पार पडली आहे. त्यामुळे शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. पंढरपूर शहरात सुमारे रोज दीडशे-दोनशे कोरोना बाधित रुग्ण आढळून येतात. एक हजार कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे पंढरपूर शहरातील नागरिकांचे लसीकरण करणे गरजेचे झाले आहे. रोज 1 हजार लसींचा पुरवठा होणे गरजेचे आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून पंढरपूर शहराला रोज दोनशे-तीनशे लस रोज मिळत असल्याने नागरिकांना लसीकरण न करता परत जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पंढरपूर शहरसाठी एक हजार लस मिळाव्यात, अशी मागणी नगराध्यक्ष साधना भोसले व अनिकेत मनोरकर यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details