महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापुरात उद्या सुशीलकुमार घालणार शिंदेशाही फेटा

काँग्रेसप्रेमींनी उद्या अर्ज दाखल करायला जाणाऱ्या सुशीलकुमारांसाठी खास असा शिंदेशाही फेटा तयार केला आहे.

By

Published : Mar 24, 2019, 8:17 PM IST

काँग्रेसप्रेमींनी सुशीलकुमारांसाठी तयार केला शिंदेशाही फेटा

सोलापूर- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यासाठी काँग्रेसने जय्यत तयारी केली आहे. तर हौशी काँग्रेसप्रेमींनी अर्ज दाखल करायला जाणाऱ्या सुशीलकुमारांसाठी खास असा शिंदेशाही फेटा तयार केला आहे.

काँग्रेसप्रेमींनी सुशीलकुमारांसाठी तयार केला शिंदेशाही फेटा

श्रीकांत गायकवाड हा काँग्रेसप्रेमी चंद्रकांत गायकवाड या गिरणी कामगाराचा मुलगा. त्यानेच शिंदे यांच्यावरील प्रेमाखातर स्वखर्चातून शिंदेशाही फेटा बनवला. तिरंगी कापडाचा हा फेटा तयार करायला त्याला ४ दिवसांचा अवधी लागला. उन्हाळा, वजन याचा त्रास शिंदे यांना होऊ नये याची दक्षताही श्रीकांतने घेतली. हा शिंदेशाही फेटा आपल्या प्रेमाचे प्रतीक असून तो सुशीलकुमार शिंदे उद्या नेसतील असा विश्वास त्याला वाटत आहे. यासंदर्भात श्रीकांतला विचारल्यावर त्याने आपले प्रेम हीच प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, उद्या काँग्रेस शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. काँग्रेस नेत्यांच्या गर्दीत शिंदेंचे वेगळेपण उठून दिसावे यासाठीच हा शिंदेशाही फेटा तयार करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details