महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशीलकुमार शिंदेंनी यंदा सोलापुरात केली गणपतीची प्रतिष्ठापना

या गणेशोत्सवात शिंदे १० दिवस कुठेच जाणार नसून त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसाठी वेळ द्यायचे ठरवले आहे. शिंदे यांच्या एकूण ४५ वर्षांच्या राजकीय जीवनात त्यांचे अख्ख कुटूंब गणोशोत्सवात एकत्र असते. या निमित्ताने त्यांच्या घरी विविध घरगुती कार्यक्रमे होतात.

सुशीलकुमार शिंदें, ज्येष्ठ काँग्रेस नेते

By

Published : Sep 2, 2019, 4:48 PM IST

सोलापूर- काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी आपला गणपती मुंबईतील वर्षा निवासस्थानी बसवला होता. तर गृहमंत्री असताना त्यांनी आपल्या दिल्लीतील निवासस्थानी बाप्पांची प्रतिष्ठापना केली होती. पण यावर्षी शिंदेंचा गणपती त्यांच्या सोलापुरातील घरात बसविण्यात आला आहे.

सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ काँग्रेस नेते

या गणेशोत्सवात शिंदे १० दिवस कुठेच जाणार नसून त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसाठी वेळ द्यायचे ठरवले आहे. शिंदे यांच्या एकूण ४५ वर्षांच्या राजकीय जिवनात त्यांचे अख्ख कुंठुंब गणोशोत्सवात एकत्र असते. यानिमित्ताने त्यांच्या घरी विविध घरगुती कार्यक्रमे होतात. यानिमित्ताने देशांत दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करलेले काँग्रेस नेते, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या गणेशोत्सव पूजेच्या निमित्ताने लोकात जाऊन पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करतील यात कुठलीच शंका नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details