पंढरपूर- सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना परस्थिती गंभीर होत आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या मुत्यूचा दर जास्त आहे. त्यात पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, बार्शी, माढा तालुक्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. या तालुक्यात लसीकरण मोहीम राबवणे गरजेचे आहे. पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीनंतर कोरोनाची लाट निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्याला दोन लाख लसीची गरज असताना केवळ १८ हजार लस दिल्या जात आहे. त्यामुळे प्रत्येक तालुका व गावाला मागणीपेक्षा लस कमी येत आहे. सोलापूर जिल्ह्याला जास्तीत जास्त लस द्यावी, अशी मागणी भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात कोरोनाची लाट..
पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीनंतर कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. पोटनिवडणुकीमध्ये नेत्यांच्या सभेत गर्दी झाल्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. चार दिवसापासून मतदारसंघांमध्ये एक हजार कोरोना रुग्णांची भर पडली आहे. पोटनिवडणुकीत कोरोना नियमांचे उल्लंघन करत हजारोंच्या सभा घेण्यात आल्या. मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यात मृत्यूचा दरही वाढणार आहे. पोटनिवडणुक प्रचारात सहभागी झालेल्या नेत्यांना कोरोना लागण झाली. मतदार संघामध्ये कोरोनाची लाट निर्माण झाल्याची परिस्थिती आहे.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात जास्त लसीकरणाची गरज..