महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोलापूर जिल्ह्यात दररोज 3 लाख लिटर सॅनिटायझरचे उत्पादन; देशभर पूरवठा करण्याची क्षमता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना तसेच काही डिस्लरी प्रकल्पांना सॅनिटायझर बनविण्याला परवानगी दिल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातून जवळपास दररोज तीन लाख लिटर सॅनिटायजर तयार होऊ लागले आहे.

solapur produces three lakh liter sanitizer  per day
सोलापूर जिल्ह्यात दररोज 3 लाख लिटर सॅनिटायजरचे उत्पादन; देशभर पूरवठा करण्याची क्षमता

By

Published : Apr 5, 2020, 10:57 AM IST

सोलापूर- जिल्ह्यात दररोज 3 लाख लिटर सॅनिटायरजचे उत्पादन सुरू झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात उत्पादित होणारे हे सॅनिटायझर महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांना देखील पाठविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे असलेल्या डिस्टलरी प्रकल्पामधून सॅनिटायझरची निर्मिती केली जात आहे.

भारतातील सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यात 40 पेक्षा अधिक साखर कारखाने आहेत. यापैकी अनेक साखर कारखान्याकडे उसापासून अल्कोहोल निर्मिती करणारे प्रकल्प आहेत. याच अल्कोहोल निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांना सॅनिटायझर तयार करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी जगभरात सध्या तरी औषध नाही. हात धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हे दोनच उपाय सध्यातरी आहेत. देशभरात सॅनिटायजरचा मोठा तुटवडा आहे. मागणी आणि पुरवठा यामध्ये प्रचंड मोठी तफावत असल्यामुळे बाजारामध्ये त्यांनी सॅनिटायजर चढ्या भावाने विकली जात आहेत.सोलापूरसह

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखाने आता सॅनिटायझर निर्मिती करू लागले आहेत. ज्या साखर कारखान्याकडे डिस्टलरी प्लान्ट आहे आणि बॉटलिंग करण्याची क्षमता आहे, अशा साखर कारखान्यांना शासनाने परवानगी दिली आहे. तीस हजार लिटर ते तीन लाख लिटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सॅनिटायजरची निर्मिती सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्यामुळे इतर राज्यात देखील सोलापूरचे सॅनिटायझर जर पाठवले जाणार असल्याची माहिती सोलापूरचे औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त भुषण पाटील यांनी दिली.

माळशिरस तालुक्यातील श्रीपुरच्या ब्रिमा सागर, माढा तालुक्यातील विठ्ठल कार्पोरेशन, मोहोळ तालुक्यातील वटवटे येथील जकराया शुगर , बीबीदारफळ लोकमंगल ऍग्रो इंडस्ट्रीज, पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, मंगळवेढ्यातील फॅबटेक शुगर, श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखाना, मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर, तसेच टेंभुर्णी एमआयडीसीतील खंडोबा डिस्टलरी आणि सोलापूर एमआयडीसीतील लक्ष्मी को-ऑपरेटिव्ह डिस्टलरी यांनादेखील सॅनिटायझर निर्मितीचा परवाना देण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details