सोलापूर: सोलापूर जिल्हा भौगोलिक व लोकसंख्येने मोठा असताना तसेच आरोग्य यंत्रणेमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणावर रिक्त असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह विभागाच्या टीमने नियोजनबद्ध कार्यक्रम राबवून हे यश संपादन केल्याची माहिती सोलापूर जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली आहे.
प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत १२ आठवड्याच्या आत गरोदर माता नोंदणी करणे. गरोदर मातेची तपासणी तसेच त्यांचे संदर्भ सेवा देणे.बालकांचे लसीकरण करणे.बालकांच्या संदर्भसेवा, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत बालकांच्या तपासण्या करणे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार माझे मुल माझी जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे राबविली. कोविडचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर असतानाही कोविड लसीकरणा बरोबरच आरोग्य विभागाच्या टीमने या पण सेवा उत्तम रित्या लाभार्थ्यांना दिल्या.
मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी अति जोखमीच्या गरोदर मातांचा पाठपुरावा केला. त्यांचे रक्तक्षय जंतदोषावर उपचार केले. सोनोग्राफीची मोफत सेवा दिली. गरोदर मातांच्या रक्ताच्या विविध चाचण्या करण्यात आल्या.संस्थेत प्रसुती झाल्यास जेवणाची सोय तसेच सदर लाभार्थ्याला घरी सोडण्याच्या सोयीसह प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व जननी सुरक्षा योजना अंतर्गत लाभ मिळवून दिला.लक्ष्य (LAKSHYA) या कार्यक्रमांतर्गत अद्यावत प्रसूती कक्ष तसेच सांस (SAANS) कार्यक्रमाअंतर्गत सर्व आशा व आरोग्य कर्मचारी यांना न्युमोनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना याचे प्रशिक्षण देऊन माता मृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत प्रशिक्षित करण्यात आले.