सोलापूर - लिफ्ट मागून क्रूझर जीपमध्ये बसलेल्या दोन महिलांना निर्जनस्थळी नेऊन त्यांचा गळा आवळून खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना सोलापूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याच आरोपींनी न्यायाधीश खटल्यावर सुनावणी करणारे व्ही. जी. मोहिते यांनी आणि खटल्यातील स्वत: च्याच वकीलांनाही धमकावले होते.
महिला हत्या प्रकरणातील तिघांना जन्मठेपेच्या शिक्षेसह प्रत्येकी 50 हजारांचा दंड हेही वाचा - शरजीलला समर्थन देणाऱ्या आंदोलकांविरोधात भाजपची मुंबई पोलिसात तक्रार
अक्कलकोटच्या शिवाजी नगर तांड्यावरील भीमराव राठोड व दोन मुले राहुल, रोशन आणि राजू चव्हाण हे क्रूझर जीप (क्रमांक एमएच 13 एझेड 8196) मधून मंगळवेढ्याकडे निघाले होते. त्यावेळी ते कामतीनजीक रेश्मा पळसे आणि सुनंदा घोडके या भगिनींनी वडापची जीप समजून लिफ्ट मागितली. त्या जीपमध्ये बसल्यावर पुढे निर्जनस्थळी गेल्यावर भीमरावने रेश्मा आणि सुनंदा यांचा दोरीने गळा आवळला व त्यांच्याकडील मोबाईल, अंगावरील सर्व सोन्याचे दागिने लुटले. या घटनेत सुनंदा घोडकेंचा मृत्यू झाला मात्र रेश्मा पळसे बचावल्या. त्यांनी कामती पोलिसांत तक्रार दाखल केली. या खटल्याचा निकाल आज सोलापूर न्यायालायाने दिला. 15 साक्षीदार तपासून आरोपींना कडक शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
दरम्यान या आरोपींनी खुद्द न्यायाधीश आणि स्वतः च्याच वकिलांना धमकावले होते. शिवाय न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करीत निकाल प्रक्रियेत अडथळा आणला होता. तरीही न्यायाधीशांनी विचलित न होता, या आरोपींना कठोर शिक्षा ठोठावली आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याने वाहनांची तोडफोड, गुन्हा दाखल