महाराष्ट्र

maharashtra

वारकऱ्यांसाठी देशातील पहिले 'मोबाईल हॅन्ड वॉश स्टेशन' सोलापुरात

आषाढी वारीच्या काळात येणाऱ्या लाखो भाविकांना शारीरिक स्वच्छतेचे, हात धुण्याचे महत्व कळावे. तसेच त्यांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी देशातील पहिले 'मोबाईल हॅन्ड वॉश स्टेशन" सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आले आहे.

By

Published : Jul 6, 2019, 12:17 PM IST

Published : Jul 6, 2019, 12:17 PM IST

मोबाईल हॅन्ड वॉश स्टेशन चा लोकार्पण सोहळा

सोलापूर-आषाढी वारीच्या काळात येणाऱ्या लाखो भाविकांना हात धुण्याचे महत्व कळावे. तसेच त्यांना हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने 8 ठिकाणी फिरते हँड वॉश स्टेशन उभारण्यात आली आहेत. हात धूण्याच्या या वाहनांचे लोकार्पण, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोंगरे, व विरोधी पक्ष नेते बळीराम काका साठे यांच्या हस्ते करण्यात आले.


सोलापूर जिल्हा परिषदेचा नाविण्यपूर्ण उपक्रम.
जिल्हा परिषदेच्या 'स्वच्छ भारत मिशनच्या' वतीने "हरीत वारी-निर्मल वारी" या उपक्रमांतर्गत देशातील पहिले 'मोबाईल हॅन्ड वॉश स्टेशन" तयार करण्यात आले असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीने या वाहनाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. लहान वाहने १५ दिवसाच्या कालावधी साठी भाड्याने घेऊन 'हॅन्ड वॉश स्टेशन' बनविण्यात आली आहेत.


या वाहनाची वैशिष्ट्ये.
या वाहनावर सहा वॉश बेसीन बसविणयात आली आहेत. हात धुण्यासाठी १ हजार लिटरची पाण्याची टाकी बसविण्यात आली आहे. हात धुतलेले पाणी रस्त्यावर पडू नये म्हणून १ हजार लिटर क्षमतेची टाकी टाकाऊ पाणी साठविण्यासाठी बसविण्यात आली आहे. तसेच जनजागृती करण्यासाठी या वाहनावर स्पिकरदेखील बसविण्यात आले आहेत. या माध्यमातून शारीरिक स्वच्छता, शौचालयाचा वापर करावा तसेच हात स्वच्छ धुण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. या वाहनाला चित्ररथा प्रमाणे सजविण्यात आले आहे. हात स्वच्छ धुण्याची पद्धत समजावून सांगणारी चित्रे या वाहनावर लावण्यात आली आहेत. यामुळे हात धुण्याचे महत्व भाविकांच्या लक्षात येते. तसेच सांडपाण्याचा उपयोग झाडांना पाणी घालण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर कुठेही घाण होत नाही आणि भाविकांचे आरोग्य सदृढ राहण्यास मदत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details