महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर पोटनिवडणुक : भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यासमोर सिद्धेश्वर आवताडे यांचे आव्हान

अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे म्हणाले, की तालुक्यातील तरुणांकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला होता. तालुक्याच्या विकासासाठी आपणही निवडणूक लढणार आहोत. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावातील पाणीप्रश्‍नासाठी पर्यायी मार्ग वापरणार आहे.

Siddheshwar Awatade
सिद्धेश्वर आवताडे

By

Published : Apr 2, 2021, 7:13 PM IST

Updated : Apr 2, 2021, 7:22 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - मंगळवेढा विधानसभेचे पोट निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी माघार घेणार नाही, असा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यासमोर सिद्धेश्वर आवताडे यांचे आव्हान असल्याचे स्पष्ट होत आहे.

अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर आवताडे म्हणाले, की तालुक्यातील तरुणांकडून निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला होता. तालुक्याच्या विकासासाठी आपणही निवडणूक लढणार आहोत. मंगळवेढा तालुक्यातील 35 गावातील पाणीप्रश्‍नासाठी पर्यायी मार्ग वापरणार आहे. मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावांचा पाणीप्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. याच मुद्द्यावरून पंचवीस वर्ष झाले प्रस्थापित आमदारांनी मते मिळविली आहेत. मात्र आजपर्यंत हा प्रश्न प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. मात्र सध्याच्या घडीला पाणी प्रश्नाला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच सोलापूर, पुणे, मुंबई या स्मार्ट सिटीसारखी पंढरपूर मंगळवेढा तालुक्याचा विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपणही निवडणूक लढवत असल्याचेही सिद्धेश्वर आवताडे यांनी यावेळी नमूद केले.

माधान आवताडे यांच्यासमोर सिद्धेश्वर आवताडे यांचे आव्हान

हेही वाचा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजप मोठ्या मताधिक्याने विजयी होणार : समाधान आवताडे

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची मध्यस्थी अयशस्वी

भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून दंड थोपटले आहेत. त्यामुळे समाधान आवताडे यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, म्हणून गुरुवारी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सिद्धेश्वर आवताडे यांचे वडील व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांची भेट घेऊन मनधरणीचा प्रयत्न केला. मात्र यातून कोणत्याही प्रकारचा मार्ग निघाला नाही. सिद्धेश्वर आवताडे यांनी उमेदवारीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे, अशामुळे समाधान आवताडे यांच्या मतांमध्ये गट होण्याची चिन्हे दिसून येत आहे. याचा फायदा भगीरथ भालके यांना होण्याचा शक्यता आहे.

हेही वाचा-पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांचे अर्ज दाखल

समाधान आवताडे यांनी विजयी होण्याचा विश्वास केला होता व्यक्त

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांनी पंढरपूर येथे प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मदतीने या मतदारसंघाचा आम्ही विकास करू, तालुक्यातील जनता भाजपला चांगल्या मतांनी विजयी करेल, असा विश्वास पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचे भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला होता.

भगीरथ भालके यांच्या विजयाचा मार्ग सुखकर...

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या समोर आता त्यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांचे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाधान आवताडे यांना मंगळवेढा तालुक्यातील पहिल्या नंबरची मत मिळाली होती. मात्र सिद्धेश्वर आवताडे यांच्या उमेदवारीमुळे पोटनिवडणुकीमध्ये मोठा परिणाम होणार आहे. यामुळे समाधान आवताडे यांना मंगळवेढा तालुक्यामध्ये घरातूनच मोठे आव्हान निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मात्र यातून महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा विजयाचा मार्ग सुखकर होणार आहे.

Last Updated : Apr 2, 2021, 7:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details