सोलापूर - जगदगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखीचे आषाढी वारीसाठी उद्या (२५ जून) देहुच्या वाड्यातुन प्रस्थान होत आहे. या वारीत दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा मानाचा पताकाधारी अश्व 'शौर्य'देखील वारीसाठी रवाना झाला आहे. या अश्वाला प्रस्थानापूर्वी महिनाभर विशेष देखरेख करुन रिंगणाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
तुकाराम महाराजांच्या पालखीचा अश्व आषाढी वारीसाठी रवाना, अकलुजच्या मोहिते-पाटलांचा 'शौर्य'ही होणार सहभागी
या पालखी सोहळ्यात अश्वांच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व सेवेचा मान लोकनेते दिवंगत प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी गेली ३० वर्षांपूर्वी सुरू केला आहे.
या पालखी सोहळ्यात अश्वांच्या रिंगणासाठी मानाचा बाभुळकरांच्या अश्वाबरोबरच पताकाधारी अश्व सेवेचा मान दिवंगत लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी गेली ३० वर्षांपूर्वी सुरू केला आहे. त्यांच्या पाश्चात डॉ. धवलसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या माता पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी ही अश्वसेवा सुरुच ठेवली आहे.
आषाढी वारीसाठी मोहिते पाटील यांचा शौर्य नावाच्या अश्वाची अश्व प्रशिक्षक सोहेल खान हे देखरेख पाहत असतात. शौर्यला हरभरा, गुळ, दुध, तुप, गव्हाचा भुस्सा, असा खुराक दिला जातो. तर आषाढी वारीसाठी रवाना होण्यापुर्वी महिनाभर आधी खुराकाबरोबर शिजवलेली बाजरी, मल्टीव्हिटॅमिन, प्रोटीन आणि कॅल्शियमयुक्त असे विशेष खाद्य दिले जाते. तसेच त्याला गोल रिंगणाकरीता धावण्याची शिकवणही दिली जाते. आषाढी वारीसाठी रवाना होताना शौर्य बरोबर डॉक्टर आणि ५ जणांची टिम निगराणी आणि देखभालीसाठी जाते.