महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर : प्रशासनाचा सावळा गोंधळ; दोन्ही लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगाच रांगा

पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पंढरपूर येथील लोकमान्य विद्यालय व कराड नाका येथील आरोग्यवर्धिनी केंद्रावर प्रत्येकी अडीचशे लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

corona vaccine pandharpur
कोरोना लसीकरण पंढरपूर

By

Published : May 11, 2021, 5:41 PM IST

Updated : May 11, 2021, 9:09 PM IST

पंढरपूर (सोलापूर) -राज्यासह जिल्ह्यामध्ये वाढणारी कोरोनाची साखळी हा चिंतेचा विषय ठरत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून लसीकरणावर जोर दिला जात आहे. जिल्ह्यामध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी पंढरपूर नगर परिषदेकडे 500 कॉविशिल्ड लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यानंतर आज (मंगळवारी) लसीकरणासाठी 45 वर्षांवरील नागरिकांनी एकच गर्दी केली. नागरिकांनी पहाटे पासून लांबच लांब रांगा लावल्या होत्या. यामुळे प्रशासनाची व पोलिसांची एकच धावपळ उडाली.

लसीकरण केंद्रावरची दृश्ये.

पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पंढरपूर येथील लोकमान्य विद्यालय व कराड नाका येथील आरोग्यवर्धिनी केंद्रावर प्रत्येकी अडीचशे लसी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. लसीकरण करण्यात येणार असल्याने नागरिकांनी पहाटे पाच वाजल्यापासून मोठी गर्दी केली होती. नागरिकांकडून कोणत्याही प्रकारच्या कोरोना नियमांचे पालन केले जात नव्हते. मात्र, प्रशासनाने वेळेत हस्तपेक्ष केल्यामुळे गर्दी कमी करण्यात यश आले. तसेच दोन्ही केंद्रांवरील लसीकरण सुरळीत चालू झाले.

हेही वाचा -पुणे महापालिका सीरममधून 25 लाख लस खरेदी करणार, अदर पूनावालांशी चर्चा सुरू

लसीकरणाबाबत सावळा गोंधळ -

पंढरपूर नगर परिषदेकडून सोमवारी नागरिकांना आवाहन करण्यात आले की, मंगळवारी पंढरपूर येथील दोन लसीकरण केंद्रावर लस दिली जाणार आहे. मात्र, 45 वर्षांवरील नागरिकांना पहिला किंवा दुसरा याबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती. त्यामुळे नागरिकांनी पहाटेपासूनच दोन्ही लसीकरण केंद्रावर झुंबड उडाली होती.

हेही वाचा -म्यूकरमायकोसिस : डिस्चार्जपूर्वी तोंडाचा एक्स-रे गरजेचा; दंत शल्यचिकित्सकांचा सल्ला

Last Updated : May 11, 2021, 9:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details