सोलापूर- आदिनाथची 19 कोटी रुपये देणी आहेत. ती ज्यांनी घेतली, परंतु वाहने वाहली नाहीत, त्यामुळे राहिली आहेत. ती चूक आमचीच आहे. ती आम्हीच सुधारणार यासाठी रश्मी बागल व दिग्विजय बागल जबाबदार असतील, अशी ग्वाही मी प्रत्येकाला देते, असे वक्तव्य करमाळा विधानसभेच्या शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांनी केले आहे. बागल या मांजरगाव येथील सभेत बोलत होत्या.
'आदिनाथ आणि मकाईची देणी आम्ही देणार'
आदिनाथची 19 कोटी रुपये देणी आहेत. ती ज्यांनी घेतली, परंतु वाहने वाहली नाहीत, त्यामुळे राहिली आहेत, असे रश्मी बागल यांनी सांगितले.
रश्मी बागल
हेही वाचा - 'संधी दिली तर तालुक्याचा सर्वांगीण विकास करता येईल'
प्रचार दौऱ्यावेळी मतदारांना आपली भूमिका समजावून सांगताना त्यांनी मतदारांनी आदिनाथ आणि मकाईची देणी देण्याचे आश्वासन दिले.