सोलापूर - चारा छावण्यांनी शेतकऱ्यांची लुबाडणूक केली असेल तर आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास आणू देऊ आणि सरकार जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करीत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. गैरप्रकार केलेल्या चारा छावण्यांवरती कारवाई करण्यास सरकारला भाग पाडणार असल्याचे स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी सोलापूर येथे सांगितले.
राजू शेट्टी यांची चारा छावणी गैरप्रकारावर प्रतिक्रिया हेही वाचा - भाजपने भ्रमात राहू नये, जोपर्यंत शरद पवार निश्चित तोपर्यंत सरकार भक्कम - शिवसेना
सांगोला तालुका हा पिढ्यानपिढ्या दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यांमध्ये शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. त्यामुळे या भागातील पशुधन वाचवण्यासाठी सरकारने तालुक्यांमध्ये जनावरांच्या चारा छावण्या सुरू केल्या होत्या. चारा छावण्या सुरू करताना सरकारने नियम अटी व शर्ती घालून दिल्या होत्या. त्या नियम अटी शर्तीचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा दिला होता. छावण्यांना लेखी आदेश दिले होते. परंतु, तालुक्यातील अनेक चारा छावण्या चालवताना शेतकऱ्यांची पिळवणूक करून जनावरांना चारा कमी देणे, पिण्याचे पाणी न देणे आणि सरकारने दिलेले नियम व अटींचे उल्लंघन करून चारा छावण्या चालवण्यात आल्या असल्याचे उघडकीस आले.
राजू शेट्टी यांनी चार छावण्यांमधील गैरप्रकारावर बोलताना सांगितले, की "कार्यकर्त्यांकडून चौकशी करून मी गैरप्रकारबद्दल माहिती घेणार आहे. त्यामुळे खरोखरच अशा चाराछावण्यांनी शेतकऱ्यांची लुबाडणूक केली असेल तर आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास आणून देऊ आणि सरकार जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेऊ." शेट्टी नागपूरला अधिवेशनासाठी जात असताना सांगोला येथे थांबले होते त्यावेळेस त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा - ज्येष्ठ अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे निधन, मुंबईत घेतला अखेरचा श्वास