महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदेडनंतर राज ठाकरेंनी सोलापूरही गाजवले; 'हरिसाल' डिजिटल गावाच्या जाहिरातीवरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल

नांदेडच्या गाजलेल्या सभेनंतर राज ठाकरेंनी सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र साधले. यावेळी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची नक्कलही केली. शिवाय 'हरिसाल' या डिजिटल गावाच्या जाहिरातीवरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

By

Published : Apr 15, 2019, 11:53 PM IST

राज ठाकरेंच्या सभेला जमलेला जनसमुदाय

सोलापूर - नांदेडच्या गाजलेल्या सभेनंतर राज ठाकरेंनी सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र साधले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या डिजिटल गावाची येथील सभेत पोलखोल केली. या संदर्भातला व्हिडिओ आज राज ठाकरेंनी सादर केला. या जाहिरातीत मॉडेल म्हणून काम केलेला तरूणाला राज ठाकरेंनी सोमवारच्या सभेत मंचावर आणले. या तरूणाला भाजपावाले शोधत आहेत. त्याला सांगत आहेत झाले गेले विसरून जा, परत ये. मात्र हा तरूण आपल्या संपर्कात आला. मी जेव्हा हरिसालची पोलखोल केली त्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले की राज ठाकरे तिकडे गेलेच नाहीत. आता हा तरूणच मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे. तसेच तिथली परिस्थिती काय आहे? हेही मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवले. आता मुख्यमंत्र्यांकडे यावर काय उत्तर आहे असा प्रश्नही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

राज ठाकरेंच्या सोलापुरच्या सभेचा आढावा

राज ठाकरे हरिसालला गेलेच नाहीत असे मुख्यमंत्री म्हणाले.मग ते म्हणाले होते मी महाराष्ट्रात १ लाख वीस हजार विहिरी बांधल्या, कुठल्या विहिरीवर तुम्ही पाणी काढायला गेला होतात? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. आजघडीला जवळपास २७००० गावं दुष्काळग्रस्त जाहीर झाली आहेत, मराठवाड्यातील लोकं दुष्काळामुळे ग्रासून वणवण फिरत आहेत.

हरिसाल या गावात डिजिटलचा 'ड' देखील नाही हे वास्तव मी गुढी पाडवा मेळाव्यात दाखवले होते. आज या गावासंदर्भातला व्हिडिओच मी तुमच्यासमोर घेऊन आलो असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या गावाची पोलखोल केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी हे आरोप फेटाळले. आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी तो व्हिडिओ दाखवून हरिसाल या डिजिटल गावाची पोलखोल केली आणि संबधित तरूणालाच मंचावर आणत भाजपाच्या दाव्यांना धक्का दिला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details