महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मटका किंग सुनील कामाठी व त्याचे साथीदार सोलापुरातून हद्दपार

शहरातील मटका किंग सुनील कामाठी व त्याच्या साथीदारांना सोलापूर पोलीस आयुक्तांनी सोलापूर शहर व जिल्हा, पूणे व उस्मानाबाद जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.

police relegated to Matka King Sunil Kamathi and his Companions in solapur
मटका किंग सुनील कामाठी व त्याचे साथीदार सोलापुरातून हद्दपार

By

Published : Jan 23, 2021, 9:08 AM IST

सोलापूर - शहरातील मटका किंग सुनील कामाठी व त्याच्या साथीदारांना, सोलापूर पोलीस आयुक्तांनी, सोलापूर शहर व जिल्हा, पुणे व उस्मानाबाद जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सुनील कामाठी मटका प्रकरणात सोलापूर शहर व जिल्हा हादरला होता. सुनील कामाठीच्या मटका व जुगार अड्ड्यावर धाडीत एका संशयीत इसमाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सुनील कामाठीची पाळेमुळे खोदून काढली होती. कोट्यवधी रुपयांची लुबाडणूक सुनील कामाठी व त्याच्या साथीदारांनी केली असल्याची माहिती देखील पोलिसांना मिळाली होती. मात्र या मटका व्यवसायामध्ये भागीदारी असलेल्या बडतर्फ पोलीस शिपाई स्टीफन स्वामीवर हद्दपारची कारवाई का झाली नाही, याची चर्चा रंगली आहे.

हद्दपार केलेल्या आरोपींची नावे-

सोलापूर पोलिसांनी शुक्रवारी रात्री हद्दपारचा आदेश पारित केला. यामध्ये सुनील दशरथ कामाठी (वय 47 ,रा. न्यू पाच्छा पेठ, खड्डा, सोलापूर), इस्माईल बाबू मुच्छाले (वय 38 वर्ष मुस्लिम पाच्छा पेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर), शंकर चंद्रकांत धोत्रे (वय 21, भगवान नगर झोपडपट्टी, सोलापूर), नवनाथ भीमशा मंगासले (वय 34 वर्ष, रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर), हुसेन सैपन शेख (वय 30 वर्ष रा. मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर), या सर्व आरोपींनी सोलापूर शहरात कल्याण मुंबई नावाचा मटका जुगार अड्डा मांडून थैमान मांडत लुबाडणूक केली होती.

ऑगस्टपासून मटका किंग सुनील कामाठी प्रकरण सोलापूरमध्ये आहे चर्चेत-
24 ऑगस्ट 2020 रोजी सोलापूर शहर गुन्हे शाखेने न्यू पाच्छा पेठ येथील कोंची कोरवे गल्लीत मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती. यामध्ये मटका अड्ड्यावर संशयीत आरोपींची धावपळ झाली होती. या धावपळीत परवेज इनामदार याचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. हा मटका अड्डा किंवा जुगार अड्डा सुनील कामाठीचा असल्याची माहिती समोर आली होती. ही घटना घडल्यापासून सुनील कामाठी फरार होता. तब्बल एक महिन्यानंतर सुनील कामाठीला शहर गुन्हे शाखेने आंध्र प्रदेश येथून अटक केले होते.

पोलीस शिपाई स्टीफन स्वामी याचा देखील या मटकाव्यवसायात समावेश-
सुनील कामाठी मटका अड्ड्याचा तपास करताना सोलापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या स्टीफन स्वामी याची देखील मटका व्यवसायात भागीदारी असल्याची माहिती समोर आली होती. पोलीस आयुक्तांनी स्टीफन स्वामी याला तात्काळ निलंबन केले होते आणि नंतर त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ केले. पण हद्दपारच्या या कारवाईमध्ये स्टीफन स्वामीवर मात्र हद्दपारची कारवाई झाली नाही. यामुळे अवैध धंदेवाल्यांमध्ये यावर का कारवाई झाली नाही, अशीही चर्चा होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details