सोलापूर -माढा पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र अजंता कटकधोंड (वय 30) यानी आत्महत्या केली आहे. सुरेंद्र यांनी सिलींग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी रात्रीच्या सुमारास माढा शहरातील पोलीस वसाहतीत ही घटना घडली.
माढ्यात पोलीस कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या
सोल्हापूर जिल्ह्याती माढा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्सटेबल सुरेंद्र कडधोंड यांनी पोलीस वसाहतीतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही
सुरेद्र कटकधोंड हे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातून माढा पोलीस ठाण्यामध्ये मे महिन्यात रुजू झाले होते. ते पोलीस वसाहतीतील आपल्या खोलीत रहात होते. घटनेच्या वेळी सुरेंद्र एकटेच खोलीत होते. त्यांची पत्नी व दोन मुले वसाहती बाहेरील प्रागंणात बसले होते. सुरेंद्र यांनी हॉल मध्ये साडीच्या मदतीने फॅनला गळफास घेतला. पोलीस कॉलनीत असलेल्या महिलांनी सुरेंद्र पख्याला लटकत असल्याचे पाहिल्यानंतर ही घटना त्यांच्या पत्नीसह माढा पोलिसांना कळवली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, दरम्यान पोलिस ठाण्यामध्ये गणपती विसर्जनाच्या बंदोबस्ताच्या कारणावरुन 12 ऑगस्टला सुरेंद्र यांची एका पोलिस अधिकाऱ्यांशी कुरबुर झाली होती. त्यानंतर ते गैरहजरच राहिले होते, अशी चर्चा केली जात आहे.
घटना समजताच पोलीस उपविभागीय अधिकारी सिद्धेश्वर भोरे यानी घटना स्थळी भेट दिली. सुरेद्र यांच्या पश्चात तिन वर्षाची मुलगी, पाच वर्षाचा मुलगा, पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. ते मुळचे बार्शी तालुक्यातील पांगरी येथील रहिवासी आहेत.