पंढरपूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत माघी यात्रेबाबत ( Magh Wari Pandharpur ) जिल्हा प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येईल. तथापि माघी यात्रेबाबत प्रशासनाने पुर्व तयारी म्हणून आवश्यक नियोजन करणे गरजेचे आहे. या कालावधीत कोरोना विषाणू ससंर्गाचा प्रादुर्भाव ( Corona Cases Increases ) वाढू नये. तसेच ही वारी सुरक्षित व सुरळीत पार पाडण्यासाठी संबधित सर्व विभागाने समन्वय राखून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव ( Provincial Officer Gajanan Gurav ) यांनी दिल्या.
माघ वारी पुर्व नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.गिराम उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी गुरव म्हणाले, गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्या वाढली ( Corona Cases Increased Pandharpur ) आहे. माघ वारी ही कोरोनाच्या संकटकाळात पार पडत असल्याने याबाबत सर्व संबधित विभागांनी आपणांस दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवण्याबाबत आरोग्य विभागाने नियोजन करावे. कोरोना चाचणी व लसीकरण केंद्राची ठिकाणे निश्चित करावीत, मुबलक औषधसाठा ठेवावा, आवश्यक ठिकाणी प्रथमोचार केंद्राची उभारणी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
अतिक्रमणे काढून घ्यावीत