महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून परिचारक, अवताडे, पाटील, डॉ. रोंगे इच्छुक : माजी मंत्री बाळा भेगडे

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील आमदार प्रशांत परिचारक समाधान, समाधान आवताडे, उद्योजक अभिजीत पाटील, डॉ. बी.पी. रोंगे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

pandharpur election
pandharpur election

By

Published : Mar 22, 2021, 6:57 PM IST

पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. त्यातच भाजपकडून उमेदवारांची चाचपणीही सुरू आहे. पोटनिवडणुकीसाठी आमदार प्रशांत परिचारक समाधान, समाधान आवताडे, उद्योजक अभिजीत पाटील, डॉ. बी.पी. रोंगे यांनी भाजपकडून उमेदवारीची मागणी केल्याची माहिती सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी व माजी मंत्री बाळा भेगडे यांनी दिली आहे.

हेही वाचा -बंदी असतानाही बैलगाडी शर्यतीचे आयोजन, प्राणीमित्राकडून कारवाईची मागणी

पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टीकडून कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी मंत्री बाळा भेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, म्हाडा लोकसभा मतदार संघाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे उपस्थित होते.

हेही वाचा -एमपीएसीची परीक्षा पडली पार; औरंगाबादमध्ये ६ कोरोना बाधितांनीही दिला पेपर

भाजप कडून पंढरपुर पोटनिवडणुकीसाठी चार जण इच्छुक...
भारतीय जनता पार्टीकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा लढविण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी चार जण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी संदर्भात इच्छुक आहेत. सोलापूर जिल्ह्यात परिचारक कुटुंब भाजपासाठी महत्वाचे आहे. त्यासाठी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह अन्य सर्व इच्छुक उमेदवारांच्या नावांची शिफारस आम्ही करणार आहोत, तसेच भाजपकडून येत्या दोन दिवसांत पोटनिवडणुकीतील उमेदवारीची घोषणा करणार असल्याची माहिती माजी मंत्री भेगडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details