महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कांद्याला प्रति किलो दोन ते तीन रुपये दर; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

मोठ्या मेहनतीने शेतात पिकवलेल्या कांद्याला दमडीएवढे भाडे मिळाल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. कडक टाळेबंदी लागेल आणि पिकवलेले पीक शेतातच जळून जाईल, या भीतीपोटी अनेक शेतकरी कांदा घेऊन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहेत.

By

Published : Apr 8, 2021, 5:10 PM IST

Updated : Apr 8, 2021, 6:05 PM IST

onion rate
कांद्याचे दर

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत साडे तीनशे ट्रक कांद्याची आवक झाल्याने कांद्याचे उतरले आहेत. अतिशय उत्तम दर्जाच्या कांद्याला प्रति किलो दोन रुपये ते तीन रुपये असा भाव मिळाला आहे. यामध्ये येण्या जाण्याचे भाडेदेखील निघाले नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.

मोठ्या मेहनतीने शेतात पिकवलेल्या कांद्याला दमडीएवढे भाडे मिळाल्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. कडक टाळेबंदी लागेल आणि पिकवलेले पीक शेतातच जळून जाईल, या भीतीपोटी अनेक शेतकरी कांदा घेऊन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल होत आहेत.

कांद्याला प्रति किलो दोन ते तीन रुपये दर

हेही वाचा-मिथुन चक्रवर्ती यांच्या रोड शोला परवानगी नाकारल्याबद्दल भाजपचे आंदोलन

टाळेबंदीच्या धसक्याने कांद्याची वाढली आवक
कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्याने राज्य सरकारने राज्यभर मिनी लॉकडाऊन (लहान टाळेबंदी) लागू केले आहे. हे नियम आणखी कडक होणार असल्याची शेतकऱ्यांनी भीती आहे. त्यामुळे सोलापूर कृषि उत्पन बाजार समितीत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांत दररोज 300 ते 325 ट्रक कांदा बाजार समितीमध्ये दाखल होत आहेत. आज (गुरुवारी) सकाळी सुमारे 350 ट्रक कांदा दाखल झाला होता. त्यामुळे कांद्याचे दर खूपच घसरले आहेत.

हेही वाचा-मिथुन चक्रवर्ती यांच्या रोड शोला परवानगी नाकारल्याबद्दल भाजपचे आंदोलन

शेतकऱ्यांचा येण्या-जाण्याचादेखील खर्च निघणे अवघड-
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोलापूर ग्रामीण, लातूर, उस्मानाबाद, विजापूर, गुलबर्गा (कर्नाटक) व अहमदनगर आदी जिल्ह्यातील शेतकरी कांदा घेऊन दाखल झाले होते. प्रत्येकी शेतकरी 200 ते 250 पोते कांदा घेऊन आले होते.

Last Updated : Apr 8, 2021, 6:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details