महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 14, 2021, 6:21 PM IST

ETV Bharat / state

Minor Girl Rape In Madha : माढ्यात बेकरीत दप्तर ठेवलेल्या शाळकरी मुलीवर बलात्कार

माढ्यात १३ वर्षीय शाळकरी मुलीवर चाॅकलेट देण्याचा बहाणा करून दुष्कर्म केल्याची ( Minor Girl Rape In Madha ) घटना माढ्यातील बस स्थानक परिसरात असलेल्या दुकानात सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली आहे. पीडित मुलीने माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार सोमवारी रात्री उशिरा बाललैगिंक अत्याचार / पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Madha bus station campus rape
माढा शहर पोलीस ठाणे

माढा (सोलापूर) -माढा शहर सोमवारी एका संतापजनक घटनेमुळे हादरले आहे. १३ वर्षीय शाळकरी मुलीवर चाॅकलेट देण्याचा बहाणा करून दुष्कर्म केल्याची ( Minor Girl Rape In Madha ) घटना माढ्यातील बस स्थानक परिसरात असलेल्या दुकानात सोमवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली आहे. पीडित मुलीने माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार सोमवारी रात्री उशिरा बाललैगिंक अत्याचार / पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संदीप मनोहर जगदाळे असे त्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान माढा पोलिसांनी त्यास अटक केले आहे.

बेकरीत दप्तर पाहण्यास केली आणि... -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडित मुलगी माढ्यातील एका माध्यमिक शाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेत आहे. माढा शहरानजीक असलेल्या गावातील ही मुलगी असुन सध्या एसटीचा संप सुरु असल्याने ती मुलगी पायी चालत शाळेला आली होती. दरम्यान शाळा सुटल्यानंतर घरी जायला एखादे वाहन अथवा एसटी आहे का पाहण्यासाठी ती बस स्थानकाकडे आली होती. वर्गातच कंपास विसरल्याने ती बस स्थानक परिसरात असलेल्या केदार स्वीट बेकरीत दप्तर ठेऊन शाळेत गेली होती. माघारी आली तेव्हा ठेवलेल्या ठिकाणी दुकानात दप्तर नव्हते. आत बेकरीत दप्तर पाहण्यास पीडित मुलगी गेली असता या मुलीस चाॅकलेटचा बहाणा करुन तिच्या सोबत आरोपीने दुष्कर्म केले.

आरोपीला 16 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी -

घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण घोगडे करीत आहेत. माढा पोलिसांत पालकांसोबत येऊन पीडित मुलीने घडलेल्या घटनेची सविस्तर हकिकत पोलीस अधिकाऱ्यांना सांगून फिर्याद दिली. आरोपीला पोलिसांनी अटककरून न्यायालयासमोर उभे केले असता १६ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा -Mother Killed Child In Kerala : बाळ रडतयं म्हणून आईने भिंतीवर डोके आपटून घेतला जीव

ABOUT THE AUTHOR

...view details