सोलापूर - मार्कंडेय महामुनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त शहरात आज रथाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष महेश कोठे, महापौर शोभाताई बनशेट्टी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या.
सोलापुरात तेलगू भाषिकांकडून मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव उत्साहात साजरा
मार्कंडेय महामुनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त रथाची मिरवणूक काढण्यात आली. रथोत्सव मिरवणुकीमध्ये श्रींची पालखी आकर्षक व सुवासिक फुलांनी सजवण्यात आली होती. श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी यावेळी पाहायला मिळाली.
पिवळ्या धमक बैलजोडीच्या रथावर आरूढ असलेली श्रींची सुबक मूर्ती या मिरवणुकीत आकर्षणाचे केंद्र ठरली होती. पारंपरिक ढोल ताशा आणि बँड पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मार्कंडेय महामुनी यांच्या जयघोषात विजापूर वेस येथून मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणूक मार्गामध्ये नाविन्यपूर्ण अशी आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी संपूर्ण परिसर आनंदाने भारावून गेला होता.
श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच लांब रांगा लावल्या होत्या. या रथोत्सव मिरवणुकीमध्ये श्रींची पालखी आकर्षक व सुवासिक फुलांनी सजवण्यात आली होती. श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी यावेळी पाहायला मिळाली. या सोहळ्याला मनपा सभागृह नेते श्रीनिवास करली, माजी सभागृह नेता संजय कोळी, नगरसेविका कुमुद आकरांम, श्रीकांचन यन्नम, गटनेते आनंद चंदनशिवे, सुरेश फलमारी तसेच पद्मशाली समाज बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.