पंढरपूर (सोलापूर)- सोलापूर व सातारला जोडणाऱ्या घाटामध्ये 19 जानेवारीला रात्री दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आठ ते दहा जणांनी एसटीवर दगडफेक केली होती. त्या प्रकरणातील पाच आरोपींच्या माळशिरस पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
पिलीव घाटातील दरोड्यातील आरोपींच्या माळशिरस पोलिसांनी मुसक्या आवळल्या
सातारा व सोलापूर पोलिसांकडून त्या ठिकाणी कॉम्बो ऑपरेशन सुरू करण्यात आली होते. याचा तपास सपोनी शशिकांत शेळके हे करत होते. हा गुन्हा घडल्यापासून यातील आरोपी हे पोलिसांना चकवा देत होते. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पथके दिवसरात्र शोध घेत होती. सपोनि शेळके यांच्या तपास पथकाने म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील म्हसवड, हिंगणी, धुळदेव, देवापूर, पळसावडे या भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले.
असा झाला होता दरोड्याचा प्रयत्न
सातारावरून सोलापूरकडे चाललेल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसला 19 जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास एसटी पिलीव घाटात आली असता. लपून बसलेल्या आठ ते दहा जणांनी एसटीवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. मात्र, एसटी चालकाचा प्रसंगावधान राखत एसटी पिलीवच्या दिशेने दुमटली. मात्र, या दगडफेकीमध्ये एसटी मागून येणाऱ्या दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला दगडफेकीमुळे चालक जखमी झाला तर एसटीचे नुकसान झाले होते. याबाबत चालक जीवराज कदम यांनी फिर्याद दिली होती.
वेशांतर करुन पोलिसांनी लावला तपास
सातारा व सोलापूर पोलिसांकडून त्या ठिकाणी कॉम्बो ऑपरेशन सुरू करण्यात आली होते. याचा तपास सपोनी शशिकांत शेळके हे करत होते. हा गुन्हा घडल्यापासून यातील आरोपी हे पोलिसांना चकवा देत होते. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पथके दिवसरात्र शोध घेत होती. सपोनि शेळके यांच्या तपास पथकाने म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील म्हसवड, हिंगणी, धुळदेव, देवापूर, पळसावडे या भागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले. आटपाडी तालुक्यातील राजेवाडी तलावाच्या परिसरात मासे खरेदीदार व्यापारी असल्याचे भासवून देवापूर, जि. माण व राजेवाडी, जि. सांगली येथे सापळा लावला व आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात एकूण 8 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 5 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यापैकी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अल्पवयीन आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करत आहे