महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाशिवरात्रीनिमित्त काशीच्या धर्तीवर कुडलच्या घाटावर संगम आरती

महाशिवरात्रीनिमित्त सूर्यास्तावेळी भीमा-सीना नद्यांच्या संगम घाटावर भक्तिमय वातावरणात संगम आरती करण्यात आली आहे.

By

Published : Feb 22, 2020, 5:09 AM IST

महाशिवरात्रीनिमित्त काशीच्या धर्तीवर कुडलच्या घाटावर संगम आरती
महाशिवरात्रीनिमित्त काशीच्या धर्तीवर कुडलच्या घाटावर संगम आरती

सोलापूर - महाशिवरात्रीनिमित्त सूर्यास्तावेळी भीमा-सीना नद्यांच्या संगम घाटावर भक्तिमय वातावरणात संगम आरती करण्यात आली आहे. कृषी संस्कृतीचा विकास व्हावा, भीमा-सीना संगम नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह अखंड वाहत रहावा तसेच नद्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संगमेश्वर देवस्थान समिती आणि भक्त मंडळांच्या वतीने यंदा ही संगम आरती आयोजित करण्यात आली होती.

महाशिवरात्रीनिमित्त काशीच्या धर्तीवर कुडलच्या घाटावर संगम आरती

पहाटेच्या सुमारास श्रींच्या मुर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर जगातील एकमेव दुर्मिळ अशा बहुमुखी शिवलिंगाला अभिषेक करून पूजा करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची पहाटे पाच वाजल्यापासूनच रांग लागली होती. बहुमुखी शिवलिंग, संगमेश्वर महाराजांचे शिवलिंग आणि पंचमुखी परमेश्वर शिवलिंगास बेलपत्र अर्पण करून भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. शिवलिंगाना भक्तीभावाने आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते.

शिवलिंगाच्या दर्शनासाठी सोलापूर,विजयपूर,कर्नाटक आणि महाराष्ट्रच्या सीमावर्ती भागातून भाविक आले होते. महाशिवरात्रीनिमित्त विशेष पूजा करण्यात आली. यंदा पहिल्यांदाच काशीच्या धर्तीवर संगम आरतीची आयोजन करण्यात आली होती. भक्तिमय सोहळ्याला भाविकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला तसेच मंदिर परिसरातील स्वामी समर्थ मंदिर, हरिहरेश्वर मंदिर, हनुमान मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी देवस्थान समिती आणि भक्तांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details