पंढरपूर (सोलापूर) - पंढरपूरमध्ये शनिवारी 68 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यात ग्रामीण भागातील 20 तर शहरातील 48 नवे रुग्ण एकाच दिवसात सापडले आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 350 झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी 25 जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना शनिवारी डिस्जार्च देण्यात आला. एकूण बरे होणाऱ्याची संख्या 87 आहे, तर एकूण रुग्ण संख्या 350 इतकी झाली आहे.
चिंताजनक ! पंढरपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ
शनिवारी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री पंढरपूर शहर आणि तालुक्यातील 374 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे.
चिंताजनक ! पंढरपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आजपर्यंतची सर्वात मोठी वाढ
शनिवारी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्री पंढरपूर शहर आणि तालुक्यातील 374 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. त्या 306 निगेटिव्ह तर 68 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
पंढरपूर शहर आणि तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्णांची संख्या 350 इतकी झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 259 इतकी झाली आहे. आतापर्यंत तालुक्यात पाच जणाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.