महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 5, 2020, 12:53 PM IST

ETV Bharat / state

पाच हजार पोस्टकार्ड अन् तुरीच्या डाळीवर साकारले 'जय श्रीराम'

लॉकडाऊनमुळे थेट अयोध्येला जाता येत नाही. आज पाच ऑगस्टला बुधवारी अयोध्येला राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. हा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला सोलापूरमधील अनेक राम भक्त अयोध्याकडे रवाना झाले आहेत.

solapur latest news  ram temple lay of foundation  solapur koli brothers sister news  सोलापूर लेटेस्ट न्यूज  राममंदिर भूमिपूजन न्यूज
पाच हजार पोस्ट कार्ड अन् तुरीच्या डाळीवर साकारले 'जय श्रीराम'

सोलापूर - अयोध्येत आज राममंदिराचे भूमिपूजन पार पडत आहे. त्यासाठी सोलापूर येथील सिद्धेश्वर कपिल कोळी व सुघनधा कोळी या बहीण भावाने पाच हजार पोस्टकार्ड आणि पाच हजार तूर डाळीवर जय श्रीराम लिहून आपला आनंद व्यक्त केला.

पाच हजार पोस्ट कार्ड अन् तुरीच्या डाळीवर साकारले 'जय श्रीराम'

लॉकडाऊनमुळे थेट अयोध्येला जाता येत नाही. आज पाच ऑगस्टला बुधवारी अयोध्येला राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. हा उद्घाटन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला सोलापूरमधील अनेक राम भक्त अयोध्याकडे रवाना झाले आहेत. पण शालेय विद्यार्थ्यांना हा सोहळा टीव्ही वर पाहता येणार आहे. त्यामुळे कपिल आणि सुघनधा यांनी पोस्ट कार्ड आणि तूर डाळीवर जय श्रीराम असे लिहिले आहे. त्यानंतर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना भेट देणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details