सोलापूर -वीजबिल न भरलेल्या घरांचे वीज कनेक्शन महावितरण कार्यालयाकडून तोडले जात आहे. या उलट आम आदमी पार्टीच्या वतीने आक्रमक पवित्रा घेत, तुम्ही वीज कनेक्शन तोडला, तर आम्ही पुन्हा जोडू, असे म्हणत गोदुताई विडी घरकूल परिसरातील अनेक घरांचे तोडलेले वीज कनेक्शन जोडली आहेत.
माहिती देताना आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष अस्लम शेख हेही वाचा -कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी सोलापुरात रात्रीची संचारबंदी
आज दिवसभर आम आदमी पार्टीच्या वतीने सायंकाळपर्यंत वीज कनेक्शन जोडण्यात आले. तसेच, महावितरण अभियंता यांना, वीज कनेक्शन तोडू नका आणि वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी पंधरा दिवस अगोदर नागरिकांना पूर्वसूचना द्या, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
विडी घरकूल परिसरात वीज जोडणी करण्यात आली
शहराला चिटकून असलेल्या गोदुताई विडी घरकूल परिसरात महावितरण कार्यालयाकडून अनेक घरांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्याबाबत अनेक नागरिकांनी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात संपर्क करून आपली कैफियत मांडली होती. आपकडून आक्रमक पवित्रा घेत, महावितरण कार्यालयाला निवेदन देऊन वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी करण्यात आली. तसेच, तुम्ही वीज कनेक्शन तोडाल, तर आम्ही पुन्हा जोडू, असा इशारा देण्यात आला.
विद्युत कायद्यानुसार १५ दिवसांअगोदर पूर्वसूचना देणे आवश्यक
विद्युत कायदा सन 2003 च्या सेक्शन 56 नुसार वीज पुरवठा खंडित करण्याअगोदर संबंधित नागरिकाला पंधरा दिवस अगोदर लेखी सूचना देणे आवश्यक आहे. पण, महावितरण कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जात आहे. हे बेकायदेशीर आहे, त्या विरुद्ध मोठे जन आंदोलन उभे करू, असा इशारा देखील आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला.
लॉकडाऊन काळातील वीजबिल टप्प्याटप्पाने भरण्याची सूट द्यावी
लॉकडाऊन काळात अनेकांना मोठ्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. रोजंदारीवर असलेल्या मजुरांचे मोठे हाल झाले. या काळात अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. नागरिकांच्या हाती रोजगार मिळत आहेत. वीज महावितरण कार्यालयाकडून घाईघाईने नागरिकांच्या घरांचा वीज पुरवठा खंडित करू नये. नागरिकांना वीजबिल भरण्यासाठी टप्याटप्याने मुदत द्यावी, अशी मागणी देखील आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली.
हेही वाचा -सोलापूर : सांगोल्यातील मोबाईल शोरूम फोडणारे दोन संशयित चोरट्यांना अटक; सहा लाखांचे मोबाइल जप्त